सकाळी मोकळ्या हवेत चालल्याने शरीराला फायदा होत असतो. परंतू थंडीत तुम्ही चालायला निघत असाल तरी थोडा बॉडी वार्म-अप जरुर करावा,तसेच योग्य कपडे घालावेत. थंडी जास्त असेल तर काळजी घ्यावी. सकाळी सकाळी येणारे हृदय विकाराचे झटके रोखण्यासाठी काही सूचना कार्डियोलॉजिस्टनी दिलेल्या आहेत.
संशोधनानुसार बहुतांश हृदयविकाराचे झटके हे सकाळी 4 ते 10 वाजता दरम्यानच येत असतात. कारण या वेळेत एपिनेफ्रीन, नोरेपीनेफ्रीन आणि कोर्टिसोल सारख्या काही हार्मोनचे प्रमाण वाढलेले असते. त्याच्यामुळे ऑक्सिजनची मागणी आणि रक्तदाब वाढू शकतो. तसेच एंडोथेलियल प्रोजेनिटर पेशींच्या पातळीत कमी झाल्याने देखील हृदय विकाराचा धक्का येऊ शकतो. थंडीतील सकाळ तर हृदय विकाराच्या झटक्याचा धोका आणखी वाढवू शकते. त्यामुळे ज्यांना हाय ब्लड प्रेशर, मधुमेह आणि फुप्फुसाच्या समस्या आहेत त्यांनी सकाळी काळजी घ्यायला हवी. सकाळी जास्त थंडी असेल तर कान, छाती, डोके नीट झाकूण फिरावे.
सकाळच्या वेळी आलेला हृदयविकाराचा झटका तापमान कमी असल्याने येतो. त्यामुळे ज्यांच्या कुटुंबात हृदय विकाराचा इतिहास असेल किंवा उच्च रक्तदाब आणि मधुमेह असेल, फुप्फुसाचे काही आजार असतील त्यांनी सकाळी थंडीत व्यायाम करु नये असा सल्ला तज्ज्ञांनी दिलेला आहे. फोर्टिस मेमोरियल रिसर्च इंस्टीट्यूटचे कार्डियोथोरेसिक आणि व्हॅस्कुलर सर्जरीचे (सीटीव्हीएस)संचालक आणि प्रमुख डॉ. उदगीथ धीर यांनी सकाळच्या वेळी अशा व्यक्तीने चालायला जाऊ नये असे म्हटले आहे.
आपल्याला सकाळी चालायला जायला असेल तर सकाळची थंडी बाधणार नाही याची काळजी घ्यावी. हाता पायांना नीट झाकावे. डोके, कान आणि हातापायांची बोटे खासकरुन झाकावीत. छातीला गरम वाटेल असे कपडे घालावते. वार्मअप शिवाय व्यायाम सुरु करु नये. थंडीत वार्मअप खूपच गरजेचा आहे. तुम्ही योग्य वार्मअप शिवाय व्यायाम करीत असाल तर तुम्ही उच्च जोखील खाली आहात. त्यांना सर्दीत हृदय विकाराचा झटका आणि स्ट्रोक येऊ शकतो. थंडीत हृदया संबंधित आजाराचे प्रमाण वाढते. रक्तदाब थंडीत अनियंत्रित असतो. थंडीत दबाव वाढतो. त्यामुळे आपले हृदय वेगाने धडधडते. आणि अधिक रक्त पंम्पिंग करण्याची गरज लागते, त्यावेळी कमजोर हृदयाच्या व्यक्तींना त्रास होतो.