अयोध्या : देशभरातील रामभक्तांना लवकरच एक चांगली बातमी मिळू शकते. येत्या नवरात्रोत्सवात राम मंदिर निर्माणाचे काम सुरु होण्याची शक्यता आहे. ट्रायल म्हणून सुरु केलेलं पायाभरणीचं काम जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. (Ayodhya – nearly 1 billion rupees and 200 kg Silver have been receivedfor the construction of ram temple)
राम मंदिराच्या पायाभरणीमध्ये तब्बल 1200 खांबांचा वापर केला जाणार आहे. त्यासाठी सुरुवातीला चार खांबांचा वापर करुन पायाभरणीच्या कामाची ट्रायल घेतली जाणार होती. ते काम पूर्ण झाले असून नवरात्रीपर्यंत त्याचा अहवाल समोर येईल. त्यानंतर त्वरीत पायाभरणीच्या मुख्य कामाला सुरुवात केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राम मंदिर बांधण्यासाठी भक्तांनी दान देण्यास सुरुवात केली आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट गठित केल्यानंतर आतापर्यंत एक अब्ज रुपये रामललाच्या खात्यांमध्ये जमा झाले आहेत. त्यासोबतच तब्बल दोन क्विंटल चांदीदेखील भक्तांनी रामललाचरणी अर्पण केली आहे. त्यातच आता परदेशात असलेले रामभक्तदेखील दान देऊ शकणार आहेत. त्यासाठीची योजना तयार करण्यात आली आहे.
श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या कॅम्प कार्यालयाचे प्रभारी प्रकाश कुमार गुप्ता म्हणाले की, “राम मंदिरासाठी दररोज मोठ्या प्रमाणात दान केलं जात आहे. जवळजवळ एक अब्ज रुपयांचे दान मिळाले आहे. दोन क्विंटलपेक्षा जास्त चांदी दान स्वरुपात मिळाली आहे, त्यामुळे सध्या रामभक्तांकडून चांदीचं दान घेण बंद करण्यात आलं आहे. भक्त चांदीऐवजी रोख रक्कम दान करु शकतात. भक्तांकडून इतकं दान मिळतंय की राम मंदिराच्या निर्मीतीदरम्यान पैसे कमी पडणार नाहीत”.
संबंधित बातम्या
Ayodhya Ram Mandir 50 News | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या 50 बातम्या
राम मंदिरावरुन रोष, दिल्ली-उत्तर प्रदेशात बॉम्ब स्फोटाचा कट, पकडलेल्या दहशतवाद्याचा मोठा खुलासा
(Ayodhya – nearly 1 billion rupees and 200 kg Silver have been receivedfor the construction of ram temple)