शहनाईचे सूर, वैदिक मंत्रोच्चार आणि गांधीजींचं आवडतं भजन… अयोध्या नगरी दुमदुमली

| Updated on: Jan 22, 2024 | 4:04 PM

Ayodhya Ram Mandir Inaugurated by PM Narendra Modi Update : अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन होत आहे. त्यामुळे अयोध्येत राममय वातावरण आहे. मंगलमय वातावरण आहे. अयोध्यानगरीत उत्साहाचं वातावरण आहे. थोड्याच वेळाआधी रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे.

1 / 5
अयोध्या, उत्तर प्रदेश | 22 जानेवारी 2024 : अयोध्येतील राम मंदिराचं आज उद्घाटन झालं. प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यामुळे अयोध्या नगरीत उत्साहाचं वातावरण आहे.

2 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन झालं. यावेळी नरेंद्र मोदी राम मंदिर परिसरात पारंपरिक वेषभूषेत आले होते.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शहनाईचे सूर ऐकायला मिळाले. तर वैदिक मंत्रोच्चाराने परिसर भक्तिमय झाला होता.

4 / 5
 पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थितांना संबोधित केलं. येणारा काळ यशाचा आहे. हे मंदिर साक्षी असेल. भारताच्या उद्याचं भारताच्या उत्कर्षाचं हे राम मंदिर साक्षीदार होईल. भव्य भारताच्या अभ्युद्याचा, विकसित भारताचा साक्षीदार बनेल, असं मोदी म्हणाले.

5 / 5
राम मंदिर उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडमधील कलाकारही सहभागी झाले होते. माधुरी दीक्षित आणि तिचा पती श्रीराम नेने, कंगना रनौत, कटरिना कैफ, विकी कौशल, रणबीर कपूर, आलिया भट, आयुषमान खुराना या सेलिब्रिटींनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावली.