अयोध्या धामाच्या 50 ठिकाणांवर देखील दिव्यांची आरास पाहायला मिळाली. स्थानिक लोकांनी देखील आपल्या घरात दिवाळीप्रमाणे दिवे लावून आनंद साजरा केला.
-
-
अयोध्येत आज (5 ऑगस्ट) होणाऱ्या राममंदिर भूमिपूजनाच्या एक दिवस आधीच रामनगरीत दिवाळीचा उत्साह होता. संपूर्ण अयोध्या दिव्यांच्या झगमगाटाने उजळून निघाल्याचं पाहायला मिळालं.
-
-
मंगळवारी रात्री (4 ऑगस्ट) सर्वात आधी रामजन्मभूमिवर दिवा लावण्यात आला. यानंतर संपूर्ण रामनगरीत दिव्यांची रोषणाई झाली आणि त्या प्रकाशात अयोध्या न्हावून निघाली.
-
-
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील लखनौमधील आपल्या निवासस्थानी दिवे लावून आनंद साजरा केला. यानंतर प्रयागराज, मथुरा, वृंदावन, वाराणसी आणि चित्रकूटसह नैमिशारण्य आणि गोरखपूरमध्ये आज दीपोत्सव साजरा केला जाणार आहे.
-
-
अयोध्यावासीयांनी आपल्या घरांबाहेर रांगोळी काढली. प्रत्येक मंदिरामध्ये रामचरित मानस आणि दोह्यांचं गायन करण्यात आलं.
-
-
‘राम की पौड़ी’ येथे मोठा दिपोत्सव पाहायला मिळाला. या ठिकाणी जवळपास सव्वादोन लाख दिवे प्रकाशमान झाले होते. या प्रकाशात संपूर्ण परिसर उजळून निघाला होता.
-
-
अयोध्या धामाच्या 50 ठिकाणांवर देखील दिव्यांची आरास पाहायला मिळाली. स्थानिक लोकांनी देखील आपल्या घरात दिवाळीप्रमाणे दिवे लावून आनंद साजरा केला.
-
-
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांनी आपल्या भोपाळ येथील घरी हनुमान चालिसा वाचनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं.
-
-
साकेत महाविद्यालयापासून हनुमानगडीपर्यंत जवळपास दीड किमीचा परिसर अगदी अनोख्या रंगात रंगला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंची घरं पिवळ्या रंगात आहेत. त्यावर रामकथेतील मोठी चित्रं आपल्या भव्यतेचा परिचय देत आहेत. या भागात सर्व ठिकाणी भगवा आणि लाल रंगाचे झेंडे आहेत.
-
-
अनेक ठिकाणी लोक या सर्व सुंदर सोहळ्याचे क्षण टिपण्यासाठी सेल्फी घेत असल्याचंही दिसलं. सुरक्षा व्यवस्थेमुळे या भागातील दुकानं बंद आहेत. या भागात सरकारी गाड्यांचीच संख्या अधिक असून त्याच फिरताना दिसत आहे. हनुमान गडीत प्रवेशाच्या ठिकाणी लावण्यात आलेले बॅरिकेट्स देखील हटवण्यात आले आहेत.
-
-
राम मंदिराच्या भूमिपूजनाआधीच अयोध्या दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाल्याने ते अनेकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
-
-
कोरोनाचा संसर्ग झालेल्या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी सांयकाळी रुग्णालयातच दिवे लावून हनुमान चालिसा पठन केलं.
Ayodhya Ram Mandir Photos