Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन दहा दिवसांवर, नागपुरातून पवित्र माती आणि पाणी रवाना

| Updated on: Aug 04, 2020 | 5:10 PM

अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आता फक्त दहा दिवस उरले (Ayodhya Ram Mandir Temple Stone Preparation)  आहेत.

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन दहा दिवसांवर, नागपुरातून पवित्र माती आणि पाणी रवाना
Follow us on

अयोध्या : अयोध्येतील श्री राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी आता फक्त दहा दिवस उरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देशातील निवडक नामवंतांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. सध्या याची तयारी उत्साहात सुरु आहे. नागपुरातून पवित्र माती आणि पवित्र संगम पाणी या भूमिपूजनासाठी रवाना करण्यात आलं. (Ayodhya Ram Mandir Temple Stone Preparation)

अयोध्येतील श्री राम जन्मभूमीत प्रभू रामचंद्रांचं भव्य मंदिराचं भूमिपूजन केलं जाणार आहे. येत्या 5 ऑगस्टला शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पवित्र मंत्रोचाराच्या जयघोषात भूमिपूजन करतील. अनेक पिढ्यांचं स्वप्न साकारण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचललं जाईल. अयोध्येत त्या पवित्र सुवर्ण मुहूर्तासाठी जोमात तयारी चालली आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

अयोध्येतील राममंदिरासाठी अवघ्या देशातून पवित्र माती आणि पाणी पाठवलं जातं आहे. नागपूरमधील रामटेक एक पवित्र स्थान आहे. त्या ठिकाणच्या पुरातन राम मंदिराला पौराणिक संदर्भ आहेत. राम वनवासात असताना रामटेकमध्ये वास्तव्यास होते, असं सांगितलं जातं. तिथल्या एका डोंगरावर 600 वर्षे जुने राम मंदिर आहे. त्याच मंदिरातील पवित्र माती अयोध्येला पाठवली गेली आहे.

नागपूरमधील अंभोरा एक पवित्र तीर्थस्थान आहे. त्या ठिकाणी पाच नद्यांचा संगम आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर वसलेल्या अंभोरामधून पंचनद्या संगमाचं पवित्र पाणीही अयोध्येला पाठवण्यात आलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयातून ते कुरिअरनं पाठवलं गेलं आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी मुख्यमंत्री आणि गोरखनाथ पीठाचे महंत म्हणूनही राम मंदिर भूमिपूजनाचं महत्व अधिकच आहे. शनिवारी ते स्वत: अयोध्येत गेले. त्यांनी तिथला आढावा घेतला.

श्री. प्रभू रामचंद्रांच्या मंदिराचं कार्य म्हणजे आपलंच कार्य असल्याच्या भावनेनं सारेच भारावले आहेत. मंदिर निर्माणात आपलाही सिंहाचा वाटा असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा आहे. रामायणात रामाला सेतू बांधताना मदत करणाऱ्या खारीची गोष्ट प्रसिद्ध आहे. रामजन्मभूमीवरील मंदिर निर्माणात आपलाही किमान खारीचा वाटा असावा असं प्रत्येकाला वाटतं आहे. (Ayodhya Ram Mandir Temple Stone Preparation)

संबंधित बातम्या : 

KP Oli | “खरी अयोध्या नेपाळमध्ये, प्रभू रामचंद्र भारतीय नव्हे, नेपाळी!” नेपाळच्या पंतप्रधानांचा जावईशोध

Ayodhya Ram Mandir | अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला