वॉशिंग्टन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या अध्यक्षीय कारकिर्दीतील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच या पुस्तकातील राहुल गांधी यांच्याविषयीची टिप्पणी भारतातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाली होती. यानंतर आता पुन्हा एकदा हे पुस्तक चर्चेत आले आहे. त्यासाठी बराक ओबामा यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी कथन केलेले एक अनुभव निमित्त ठरला आहे. (Barack Obama in his memoir recalling his conversation with Manmohan Singh during his visit to India in December 2010)
बराक ओबामा यांनी ‘अ प्रॉमिस्ड लँड’ (A Promised Land) या पुस्तकात डिसेंबर 2010 मध्ये भारत दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा सांगितला आहे. त्यावेळी बराक ओबामा यांच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. या मेजवानीला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेदेखील उपस्थित होते.
ही मेजवानी रात्री उशिरापर्यंत सुरु होती. डॉ. मनमोहन सिंगांचा थोड्या थोड्या वेळाने पाण्याचा घोट घेत झोप घालवण्याचा प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. त्यामुळे उशीर होत असल्याचे माझ्या लक्षात आले. निरोप घेण्याची वेळ आली अस मी मिशेलला खुणावलं. पंतप्रधान आणि त्यांच्या पत्नी आम्हाला सोडायला कारपर्यंत आल्या. त्या मंद उजेडात मला थकलेले पंतप्रधान त्यांच्या वयापेक्षा अधिक वृद्ध वाटले. तिथून निघताना ही व्यक्ती पदावरून पायउतार झाल्यानंतर कसं होईल हाच प्रश्न माझ्या मनात घोळत होता, असे बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.
‘मुस्लिमविरोधी लाटेमुळे भाजपला बळ मिळाल्याने मनमोहन सिंगांना चिंता वाटत होती’
मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला तात्काळ प्रत्युत्तर न देण्याचा निर्णय घेतला. मात्र, या संयमाची राजकीय किंमत त्यांना चुकवावी लागली. यानंतर त्यांनी एकदा माझ्याशी बोलताना भारतातील मुस्लिमविरोधी लाटेमुळे भाजपच्या वाढत्या ताकदीविषयी चिंता व्यक्त केली होती.
भारतामध्ये धार्मिक आणि वांशिक ध्रुवीकरण उन्माद निर्माण करणारे ठरेल. अशा गोष्टींचा फायदा उठवणे राजकारण्यांसाठी फार अवघड नसते, असे मनमोहन सिंग यांनी ओबामा यांना सांगितले होते.
संबंधित बातम्या:
राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा
राहुल गांधींना देशातील बदनामी कमी पडते म्हणून आता परदेशातही स्वत:ची बदनामी करुन घेतायत: गिरीराज सिंह
बराक ओबामांना भारतीय नेत्यांविषयी बोलण्याचा अधिकार कोणी दिला; शिवसेनेकडून राहुल गांधींची पाठराखण
(Barack Obama in his memoir recalling his conversation with Manmohan Singh during his visit to India in December 2010)