बारामती : कोरोनाचा वाढता विळखा पाहता (Corona Virus), बारामती नगरपरिषदेने (Baramati Pattern To Stop Corona) कोरोनाला रोखण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. बारामतीतील 44 वॉर्डमधील 44 नगरसेवक, 44 झोनल ऑफिसर, 44 पोलीस कर्मचारी आणि 440 स्वयंसेवक मिळून बारामतीकरांना अत्यावश्यक (Baramati Pattern To Stop Corona) सुविधा घरपोच पोहोचवणार आहेत.
कसा आहे कोरोना प्रतिबंधाकरीता ‘बारामती पॅटर्न’?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरामध्ये प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमार्फत एकूण 44 झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रत्येक झोनसाठी मदत सहायता अधिकारी, त्यांना सहाय्य करण्यासाठी 10 स्वयंसेवक आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 1 वॉर्ड मार्शल यांची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने आरोग्य सेवा, रेशन, अन्नधान्य पुरवठा, दूध आणि भाजीपाला, फळे, गॅस सिलेंडर घरपोच देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणार आहे.
या टीममार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि त्याची साखळी तुटण्यासाठी ज्या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचे हायरिस्क कॉन्टॅक्ट आणि लोरिस्क कॉन्टॅक्ट शोधून वेळीच त्यांना वेगळं करण्यात येईल. गरज भासल्यास त्यांची कोविड-19 तपासणी करण्यात येईल. आरोग्य विभागाकडून अशा रुग्णांची तपासणी करुन ज्यांना रक्तदाब (बीपी), मधुमेह (शुगर) आणि इतर गंभीर आजार असल्यास शोधून त्यांची तपासणी करता येईल (Baramati Pattern To Stop Corona). यादरम्यान, सोशल डिस्टंसिंगची अंमलबजावणी होते की नाही, यावर देखील नजर ठेवता येणे शक्य होईल.
Corona : कल्याणमध्ये सहा महिन्यांच्या बाळाची कोरोनावर मात, नागरिकांकडून टाळ्या,थाळ्या वाजवत जंगी स्वागतhttps://t.co/3363w8GNfm#Kalyan #CoronaInMaharashtra #FightAgainstCOVID19
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 12, 2020
या पॅटर्नमध्ये समाविष्ट लोकांव्यतिरिक्त इतर कुणीही रस्त्यावर येणार नाही, असे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. किराणा, भाजीपाला, दूध औषधं यांसह जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातील.
बारामतीत 44 वॉर्ड असून प्रत्येक वॉर्डला एक झोनल ऑफिसर असेल. शिवाय, स्थानिक नगरसेवक आणि एक पोलीस, असं तिघांचे पथक तयार केलं आहे. त्यांच्या मदतीला 10 स्वयंसेवक असतील. यामध्ये सर्वांना मास्क, सॅनिटायझर आणि हॅण्डग्लोव्ह्स पुरवले गेले आहेत. प्रत्येक स्वयंसेवकाला तीस घरं वाटून दिली जाणार आहेत. आजपासून हा पॅटर्न राबविला जाणार आहे
इतर राज्यातही बारामती पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता
प्रशासनाने बारामतीत केलेल्या उपाययोजना आता राज्यस्तरावर राबविला जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याधिकारी या पॅटर्नची माहिती राज्य सरकारला देणार आहे. त्यामुळे राज्यात आता भिलवाडा पॅटर्नसोबत बारामती पॅटर्नही राबविला जाणार असल्याची शक्यता आहे (Baramati Pattern To Stop Corona).
लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढवलं, मुख्यमंत्र्यांकडून घोषणा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी लॉकडाऊन 16 दिवसांनी वाढवत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे आता राज्यात 14 एप्रिल नाही तर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. कोरोनाचा धोका पाहता तो आणखी पसरु नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात कुठे किती कोरोना रुग्ण? पाहा संपूर्ण यादी
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |