‘कोरोना’विषयी अफवा पसरवणं अंगलट, पुण्यानंतर बीडमध्ये दोघांवर गुन्हा

| Updated on: Mar 16, 2020 | 11:59 AM

आष्टीत कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Beed FIR Corona Rumors

कोरोनाविषयी अफवा पसरवणं अंगलट, पुण्यानंतर बीडमध्ये दोघांवर गुन्हा
Follow us on

बीड : कोरोना झाल्याची अफवा पसरवणाऱ्यांना आता कायद्याच्या कचाट्यात अडकावे लागणार आहे. बीडमध्ये ‘कोरोना’विषयी अफवा पसरवणाऱ्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी पुण्यातील अफवेखोरांवरही गुन्हा नोंदवण्यात आला होता. (Beed FIR Corona Rumors)

बीडमधील आष्टीत कोरोनाची लागण झाल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये अद्याप कोरोनाची लागण झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही.

पुण्यातील हॉटेलमध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची खोटी माहिती पुण्याच्या विभागीय आयुक्तांना देण्यात आली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकरांनी कालच अफवाखोरांना धडा शिकवण्याचा इशारा दिला होता.

जगभर हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूबाधितांची राज्यातील संख्या 33 वर पोहोचली. रविवारपर्यंत 95 संशयितांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती.

कोरोनाचे रुग्ण

मुंबई- 05
पिंपरी चिंचवड- 09
पुणे- 07
नागपूर- 04
ठाणे- 01
कल्याण- 01
रायगड- 01
अहमदनगर- 01
यवतमाळ- 02
नवी मुंबई- 01
औरंगाबाद- 01

महाराष्ट्रात कुठे आणि कधी कोरोनाचे रुग्ण आढळले? Beed FIR Corona Rumors

  • पुण्यातील दाम्पत्य (2) – 9 मार्च
  • पुण्यातील दाम्पत्याची मुलगी (1) – 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाचा नातेवाईक (1)– 10 मार्च
  • पुण्यातील कुटुंबाला नेणारा टॅक्सी चालक (1)– 10 मार्च
  • मुंबईतील सहप्रवासी (2) – 11 मार्च
  • नागपूर (1) – 12 मार्च
  • पुणे (1) – 12 मार्च
  • पुणे (3) – 12 मार्च
  • ठाणे (1) – 12 मार्च
  • मुंबई (1) – 12 मार्च
  • नागपूर (2) – 13 मार्च
  • पुणे (1) – 13 मार्च
  • अहमदनगर (1) – 13 मार्च
  • मुंबईत (1) – 13 मार्च
  • नागपूर (1) – 14 मार्च
  • यवतमाळ (2) – 14 मार्च
  • मुंबई (1) – 14 मार्च
  • वाशी (1) – 14 मार्च
  • पनवेल (1) – 14 मार्च
  • कल्याण (1) – 14 मार्च
  • पिंपरी चिंचवड (5) – 14 मार्च
  • औरंगाबाद (1) – 15 मार्च
  • पुणे (1) – 15 मार्च
  • एकूण – 33 कोरोनाबाधित रुग्ण

दरम्यान, पुण्यात आठ ठिकाणी संचारबंदीचा प्रस्ताव पालिका आयुक्तांनी पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. (Beed FIR Corona Rumors)

हेही वाचा : कोरोनामुळे बंदिस्त घरात वादविवाद, चीनमध्ये घटस्फोटाच्या अर्जात वाढ