बीड : शिवसेना युवा प्रमुख राहुल फरताळे यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला करण्यात आला (Attack On Yuvasena President). शहरातील सारडा नगरी परिसरात गुरुवारी (16 जानेवारी) दिवसा ढवळ्या हा हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. हल्ला झाल्यानंतर फरताळे यांनी घटनास्थळावरुन पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. दरम्यान राहुल फरताळे यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Attack On Yuvasena President).
राहुल फरताळे हे त्यांच्या घराकडून शहरात येत होते. तेव्हा सावता माळी चौकाच्यापुढे आल्यानंतर दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी राहुल फरताळे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर त्यांच्यावर तलवार आणि कुकरी ने थेट हल्ला चढवला. हे अवघ्या काही क्षणांत झाल्याने नेमकं काय घडतंय हेच राहुल फरताळे यांना कळालं नाही. हल्लेखोर हल्ला करत असताना राहुल यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. राहुल यांना आरडाओरड करताना पाहून हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. राहुल फरताळे यांचा आवाज ऐकून जमलेल्या लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले.
हल्लेखोरांमध्ये खंडू जगताप आणि दादाराव जगताप यांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. काही वर्षांपूर्वी जगताप आणि फरताळे यांच्यात वाद झाला होता. कदाचित त्याच वादातून हा हल्ला झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या प्राणघातक हल्ल्यात राहुल फरताळे हे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, शहर पोलीस ठाण्यात प्राथमिक गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
Attack On Yuvasena President
व्हिडीओ :