बीड: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 80 वाढदिवस राज्यभरात साजरा करण्यात आला. परळीतही सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पवारांच्या वाढदिवसानिमित्त 81 किलोचा केक कापला. पण हा केक घेण्यासाठी कार्यकर्त्यांनी अशी काही गर्दी केली की पोलिसांना लाठीमार करावा लागला! हा संपूर्ण प्रकार धनंजय मुंडे यांचा मतदारसंघ असलेल्या परळीमध्ये घडला आहे. (Big crowd for cake at Sharad Pawar’s birthday party organized by Dhananjay Munde)
अभिनेते गोविंदा आणि त्यांच्या पत्नीच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि गोविंदाच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. धनंजय मुंडे आणि गोविंदा यांच्या हस्ते पवारांच्या वाढदिवसाचा 81 किलोचा केक कापण्यात आला. हा कार्यक्रम संपल्यानंतर केक खाण्यासाठी स्टेजवर मोठी गर्दी उसळली. प्रत्येकजण केक खाण्यासाठी धावत होता. त्यावेळी काही मुलं स्टेजवरुन खालीही पडली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि गर्दी कमी केली. त्यावेळी पोलिसांना लाठीमारही करावा लागला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्यावर दिग्गज नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महाविकास आघाडी सरकारचे नेते आणि मंत्री जयंत पाटील, छगन भुजबळ, नवाब मलिक, धनंजय मुंडे यांच्यापासून ते महाविकास आघाडीचे शिल्पकार किंबहुना ठाकरे सरकार बनवण्यात पवारांएवढाच ज्यांचा मोलाचा वाटा आहेत ते संजय राऊत आणि राष्ट्रवादीची धडाडती तोफ अमोल मिटकरी आदींनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
‘सामना’ अग्रलेखातून स्तुती
शिवसेनेने शरद पवार यांच्यावर ‘सामाना’तून अग्रलेख लिहिला असून त्यात त्यांची स्तुतीही करण्यात आली आहे. 80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय. खऱ्या अर्थाने लोकप्रिय, संघटना कुशल, राज्याचे व देशाचे प्रश्न उत्तम तऱ्हेने जपणाऱ्या, मोदींपासून क्लिंटनपर्यंत संबंध ठेवणाऱ्या, सुस्वभावी, स्नेह आणि शब्द जपणाऱ्या, हत्तीची चाल आणि वजिराचा रुबाब असलेल्या शरद पवार यांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि हिमालयाची उत्तुंगता गाठणारे होवो, हीच शुभेच्छा!, अशा शुभेच्छा ‘सामना’ अग्रलेखातून देण्यात आल्या आहेत.
Sharad Pawar Birthday : ‘वय वर्षे 80 असलेले पवार हे ज्येष्ठ आहेत की तरुण, या संभ्रमात अनेक वर्षे देश आहे’https://t.co/nWxk2Plfol@ShivSena @PawarSpeaks @NCPspeaks @rautsanjay61 @dhananjay_munde @INCMaharashtra #SharadPawar #sharadpawarbirthday
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2020
संबंधित बातम्या:
Big crowd for cake at Sharad Pawar’s birthday party organized by Dhananjay Munde