सकाळी उपाशी पोटी पाण्यात भिजवलेले अंजीर खाण्याचे फायदे काय ?

| Updated on: Oct 20, 2024 | 2:14 PM

भिजवलेले अंजीर सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने आपल्या शरीराला मोठा फायदा होतो. अंजीर पोषक तत्वांनी भरपूर असल्याने त्याच्या रोजच्या सेवनाने शरीराची अनेक आजारातून सुटका होते.

सकाळी उपाशी पोटी पाण्यात भिजवलेले अंजीर खाण्याचे  फायदे काय ?
anjeer
Follow us on

अंजीर स्वादिष्ट असले तरी आरोग्यासाठी लाभदायक आहेत. अंजीरात प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अन्य पोषकतत्व तुमच्या शरीराला मजबूत बनवितात. रात्री दूधात किंवा पाण्यात अंजीर भिजवून ठेवावे आणि ते सकाळी उपाशी पोटी खाल्ल्याने खूप फायदे होतात. अंजिराने पचन यंत्रणा चांगली राहते. वजन कमी करण्यास देखील ते मदत करते. रिकाम्या पोटी अंजीर खाल्ल्याने नेमके काय फायदे होतात हे पाहूयात..

ब्लड शुगर नियंत्रण

अंजीरात असलेले पोटॅशियम ब्लड शुगर लेव्हलला नियंत्रित करण्यास मदत करते. अनेक अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की अंजिरातील एसिड ब्लड शुगरला कमी करण्यास मदत करते. त्यामुळे पाण्यात भिजलेल्या अंजीराचा टाईप-2 मधुमेहीसाठी फायदा असतो. तुम्ही अंजीर स्मुदी, सलाड, दूध किंवा दही सोबत देखील खाऊ शकता.

मजबूत हाडांसाठी

भिजवलेले अंजीर हाडांच्या मजबूतीसाठी चांगलेच फायदेशीर असते. यात भरपूर प्रमाणात कॅल्शियमचे प्रमाण असते. जे हाडांना मजबूत करण्यासाठी आवश्यक असते. दूध, दही आणि हिरव्या भाज्यांसह आपल्या आहारात अंजीराचा देखील समावेश करावा, त्यामुळे तुमची हाडे मजबूत होतील, नियमित रुपाने जर अंजीर खाल्ले तर ऑस्टियोपोरोसिस सारख्या आजारांत फायदा होतो.

वजन कमी करण्यासाठी

वाढत्या वजनाने तुम्ही त्रस्त आहात तर काही चिंता करु नका, भिजवलेले अंजीर तुमचे वजन घटविण्यासाठी फायदेमंद होऊ शकतात. कॅलरी लो असूनही अंजीरात फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटते त्यामुळे तुम्हाला वारंवार स्नॅक्स खाण्याची इच्छा होणार नाही.तसेच अंजिरातील पोषक तत्वं तुमच्या पचन संस्थेला मजबूत करीत मेटाबॉलिझमला वाढवते. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्याबरोबर इतरही फायदे होतात.

ब्लड प्रेशर नियंत्रित

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी भिजलेले अंजीर रामबाण उपाय आहे. यातील ऑस्टियोपोरोसिस तुमच्या शरीराला इजा करणाऱ्या फ्री रेडिकल्सशी लढतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहाते. भिजवलेले अंजीर हृदयाचे आरोग्य देखील सुधारत असते.

( सूचना : ही माहीत सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहीतीसाठी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा )