भोपाळ: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. पोलिसांनी भय्यू महाराजांचा विश्वासू सेवक विनायक दुधाळेला अटक केली आहे. विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांच्या आत्महत्येनंतर काही दिवसांनी गायब होता. जवळपास साडेतीन महिन्यानंतर त्याला शुक्रवारी रात्री पोलिसांनी अटक केली. भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी इंदूरमध्ये राहत्या घरी गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या सहा महिन्यानंतर पोलिसांनी महाराजांचा ड्रायव्हर कैलास पाटीलला अटक केली. त्यानंतर दिवसेंदिवस भय्यू महाराजांच्या आत्महत्येचा उलगडा करताना पोलिसांना अनेक धागेदोरे मिळत आहेत.
विनायक दुधाळे हा भय्यू महाराजांचा विश्वासू सेवक होता. मात्र जून महिन्यात भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्यानंतर तो गायब झाला होता. ड्रायव्हरला अटक केल्यानंतर त्याने विनायक दुधाळेचं नाव घेतलं होतं. कैलास पाटीलने महाराजांचे वकील राजा बडजात्यांकडे खंडणी आणि धमकावलं होतं. कैलास पाटीलने विनायक हा अन्य सहकाऱ्यांच्या माध्यमातून भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करत असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं. तेव्हापासून इंदूर पोलिस विनायकचा शोध घेत होते.
त्याआधी भय्यू महाराजांची दुसरी पत्नी डॉ. आयुषी शर्मा आणि पहिल्या पत्नीची कन्या कुहू यांनी काही दिवसांपूर्वी पोलिस उपमहानिरीक्षक हरीनारायणचारी मिश्र यांची भेट घेतली होती. भय्यू महाराजांचे दोन सेवक आणि एका तरुणीने ब्लॅकमेल केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर पोलिसांना तपासाची आणखी एक दिशा मिळाली होती.
कैलाश पाटील उर्फ भाऊ जो अध्यात्मिक संत भैय्यू महाराजांचा ड्रायव्हर होता. या ड्रायव्हरला आणि दोन सेवकांना इंदूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 12 जून 2018 रोजी संध्याकाळी महाराजांना यांनीच खंडणीसाठी फोन केल्याचं आता उघड होतंय. खंडणीसाठी यांनीच मास्टरप्लान आखला होता. ड्रायव्हरने महाराजांकडून 5 कोटींची खंडणी मागीतल्याचा आरोप आहे. खंडणी दिली नाही, तर बिंग फोडण्याची धमकी हा वारंवार महाराजांना देत होता.
आपल्या शेवटच्या चिठ्ठीत महाराजांनी मी, स्वत: तणावामुळे आत्महत्या करत आहोत, असं नमूद केलं होतं. पण अखेर भय्यूजी महाराजांनी असा निर्णय का घेतला असावा, याबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात होते. याचं उत्तर हळूहळू मिळत आहे. भय्यू महाराज्यांच्या ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलंय, की “त्याने स्वत: भैय्यू महाराजांना 5 कोटींसाठी ब्लॅकमेल केलं होतं. आश्रमातील एक तरुणी महाराजांकडे 40 कोटींची मागणी करत होती. तरुणी महाराजांना व्हिडीओ आणि ऑडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायची. संबंधित तरुणी महाराजांकडे 40 कोटी आणि 40 लाखांची कार मागत होती. मुंबईत 4 बीएचके फ्लॅट आणि मल्टी नॅशनल कंपनीत नोकरी मागत होती. याबद्दल महाराजांच्या दोन खास सेवादारांना माहिती होती. ते महाराजांना मैत्रेय संस्थेला आलेल्या 100 कोटींच्या दानापैकी 50 कोटींची मागणी करत होते.
जगाला आयुष्याचा सार समजावणारे, ताण-तणावातून मुक्त होण्याची युक्ती सांगणारे संत भय्यूजी महाराज स्वत: या तणावामुळे खचले.एकीकडे मुलगी आणि पत्नीची सततची भांडणं तर दुसरीकडे ट्रस्टचे सेवक आणि एक तरुणी सतत महाराजांनी खंडणीसाठी फोन करायची. आत्महत्येपूर्वी महाराज एका हॉटेलमध्ये एका महिलेसोबत सीसीटीव्हीत अखेरचे दिसले होते. ही तीच तरुणी आहे का, जी 40 कोटींसाठी महाराजांना ब्लॅकमेल करत होती, असा सवाल आता निर्माण झाला आहे.
तपासात असंही समजलंय, की सेवक विनायक दुधालेच ब्लॅकमेलिंग करणाऱ्या मुलीला पैसे पोहचवण्यासाठी जात होता. अनेकदा त्याचं या मुलीशी बोलणं झालं होतं. महाराजांना त्यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केलंय का, आणि ब्लॅकमेलिंगमागे त्याचाच हात होता का, याचाच आता पोलीस कसोशिने तपास करत आहेत.
आपल्या शेवटच्या चिठ्ठीत महाराजांनी मी, स्वत: तणावामुळे आत्महत्या करत आहोत, असं नमूद केलं होतं. पण अखेर भय्यूजी महाराजांनी असा निर्णय का घेतला असावा, याबद्दल निरनिराळे तर्कवितर्क लढवले जात होते. याचं उत्तर हळूहळू मिळत आहे.