आंतरराष्ट्रीय भजन गायकाची पत्नी-मुलांसह हत्या, अपहृत मुलाचाही मृतदेह आढळला

| Updated on: Jan 01, 2020 | 2:30 PM

पाठक दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर त्यांच्या दहा वर्षीय अपहृत मुलाचा मृतदेहही घराजवळ आढळला

आंतरराष्ट्रीय भजन गायकाची पत्नी-मुलांसह हत्या, अपहृत मुलाचाही मृतदेह आढळला
Follow us on

लखनौ : संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात रंगलेलं असताना उत्तर प्रदेश हायप्रोफाईल कुटुंबातील चौघांच्या हत्याकांडाच्या घटनेने हादरलं आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भजन गायक अजय पाठक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची निर्घृण हत्या (Bhajan Singer Ajay Pathak Murder) करण्यात आली आहे.

पाठक दाम्पत्य आणि त्यांच्या मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली, तर त्यांच्या दहा वर्षीय अपहृत मुलाचा मृतदेहही
घराजवळ आढळला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील शामलीमध्ये ही अंगावर
शहारे आणणारी घटना घडली.

टीव्ही अभिनेत्रीकडून नवऱ्यासमोरच एक्स-बॉयफ्रेण्डची हत्या

अजय पाठक यांच्या कुटुंबातील तिहेरी हत्याकांडाच्या घटनेने उत्तर प्रदेशात खळबळ उडालेली असतानाच त्यांचा दहा वर्षीय मुलगा भागवत याचाही मृतदेह पानिपत टोलनाक्याजवळ आढळला. भागवतचा मृतदेह ठेवलेली गाडी पेटवण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केलं.

अजय पाठक यांची 36 वर्षीय पत्नी स्नेहा, बारा वर्षीय मुलगी वसुंधरा यांचे मृतदेह बंद घरात आढळले. मंगळवारी सकाळी पाठक कुटुंब स्नेहा यांच्या माहेरी जाणार होतं, मात्र सोमवारी रात्रीच हे हत्याकांड घडलं. हत्येचं कारण आणि आरोपी यांच्याविषयी अद्याप माहिती मिळाली नाही. पोलिस अधिक तपास (Bhajan Singer Ajay Pathak Murder) करत आहेत.