भंडारा : भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डला मध्यरात्री अचानक आग लागली. या आगीत 17 नवजात बाळांपैकी 10 बालकांचा मृत्यू झाला. तर जुळ्या बालकासह 7 शिशूंना तात्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी आणि अग्निशमन विभागाच्या मदतीने या सर्व बालकांना तात्काळ बाहेर काढण्यात आलं आहे. (Bhandara Hospital fire Update)
नेमकं प्रकरणं काय?
भंडारा इथं सरकारी रुग्णालयात मध्यरात्री अग्नितांडव झालं. भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बाळांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील शिशु केअर युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. शुक्रवारी मध्यरात्री 2च्या सुमारास ही आग लागली. या आगीतून 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे.
ही आग पसरु नये तसेच आगीवर नियंत्रण मिळवता यावे यासाठी भंडारा नगर परिषद, सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथकांनी शर्थीचे प्रयत्न केले. सध्या ही आग पूर्णत: विझविण्यात आलेली असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे.
दरम्यान लहान मुलांच्या अतिदक्षता वार्डात 17 नवजात शिशू दाखल झाले होते. त्यापैकी 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. त्या सर्व बालकांच्या मातांची नाव जाहीर करण्यात आली आहे.
आईचे नाव मृत्यू ठिकाण
1) हिरकन्या हिरालाल भानारकर – बालक-स्त्री – उसगाव (साकोली)
2) आईचे नाव – प्रियंका जयंत बसेशंकर – बालक-स्त्री – जांब (मोहाडी)
3) आईचे नाव – योगिता विकेश धुळसे – मृतबालक-पुरुष) – श्रीनगर पहेला (भंडारा)
4) आईचे नाव – सुषमा पंढरी भंडारी – बालक-स्त्री – मोरगाव अर्जुनी (गोंदिया)
5) आईचे नाव – गिता विश्वनाथ बेहरे – बालक-स्त्री – भोजापूर (भंडारा)
6) आईचे नाव- दुर्गा विशाल रहांगडाले – बालक-स्त्री – टाकला (मोहाडी)
7) आईचे नाव – सुकेशनी धर्मपाल आगरे – बालक-स्त्री – उसरला (मोहाडी)
8) आईचे नाव – कविता बारेलाल कुंभारे – बालक-स्त्री – सितेसारा आलेसूर (तुमसर),
9) आईचे नाव – वंदना मोहन सिडाम – बालक-स्त्री – रावणवाडी (भंडारा),
10) अज्ञात (बालक-पुरुष)
तसेच संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर यातील नऊ शिशूंचे मृतदेह संबंधित नातेवाईकांकडे सोपविण्यात आले आहेत. तर सुरक्षित स्थळी हलविण्यात आलेल्या बालकांमध्ये एका जुळ्यांचा समावेश आहे.
आईचे नाव – सुरक्षित हलवलेली बालक
1) शामकला शेंडे – बालक-स्त्री
2) दीक्षा दिनेश खंडाते बालक – स्त्री (जुळे
3) अंजना युवराज भोंडे – बालक-स्त्री
4) चेतना चाचेरे – बालक-स्त्री
5) करिश्मा कन्हैया मेश्राम – बालक-स्त्री
6) सोनू मनोज मारबते – बालक-स्त्री
बालकांच्या अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीसंदर्भातील प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सादर केला आहे. त्यावरुन ही माहिती समोर आली आहे. (Bhandara Hospital fire Update)
संबंधित बातम्या :
Bhandara Fire : घरी जाऊन मातांचं सांत्वन, उद्याच्या उद्या 5 लाख, दोषींना सोडणार नाही : राजेश टोपे