नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. काँग्रेससह आम आदमी पक्षानं शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Delhi Chief Minister Arvind Kejriwal in House arrest)
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर काल सिंधू बॉर्डरवर जात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकार शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव आखत होतं. पण आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा केजरीवाल यांनी दिला आहे.
AAP MLA @akhilesht84 was not allowed to meet CM @ArvindKejriwal who’s under house arrest.
MLA Akhilesh Tripathi was manhandled by police. #BJPHouseArrestsKejriwal #आज_भारत_बंद_है
pic.twitter.com/r7IC23vo0B pic.twitter.com/RsnwXF0pga— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
केजरीवाल यांनी काल आंदोलकांची भेट घेतल्यानंतर त्यांना आज नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. केजरीवाल आज पुन्हा भारत बंदमध्ये रस्त्यावर उतरले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या भीतीनं ही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
Important :
BJP’s Delhi Police has put Hon’ble CM Shri @ArvindKejriwal under house arrest ever since he visited farmers at Singhu Border yesterday
No one has been permitted to leave or enter his residence#आज_भारत_बंद_है#BJPHouseArrestsKejriwal
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
दिल्ली-मेरठ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. गाझीपूर बॉर्डरवर शेतकऱ्यांनी महामार्गाची दूसरी बाजूही बंद केली आहे. त्यामुळे आता दिल्लीत प्रवेश करण्याचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. भारत बंद दरम्यान कुणालाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जात असल्याचं नोएडाचे सहाय्यक पोलिस आयुक्त लव कुमार यांनी सांगितलं. रेल्वे स्थानक, बस स्टँड, मेट्रो स्टेशन, ऑटो सर्व्हिस अशा अनेक ठिकाणी मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसंच जो कुणी कायदा हातात घेऊल त्यावर कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत दाखल झाले आहेत. ते आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. काल केंद्रीय कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी शरद पवार यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप करत जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आज पवार आणि राजनाथ सिंह यांच्यात बैठक पार पडत आहे. या बैठकीत शेतकरी आंदोलनासह अन्य मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या:
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा सोनिया गांधींचा निर्णय
Delhi Chief Minister Arvind Kejriwal in House arrest