मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत गेल्या 12 दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांनी आज भारत बंदची हाक दिली आहे. त्यांच्या या हाकेला काँग्रेससह जवळपास सर्वच विरोधी पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला. त्यानुसार आज विविध राज्यात अनेक ठिकाणी बंदचा परिणाम पाहायला मिळाला. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या बंदचा काय परिणाम झाला. याचं चित्र या रिपोर्टमधून आपण पाहू शकणार आहात. (Special report: response of Bharat band across india)
महाराष्ट्रातील स्थिती काय?
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात महाराष्ट्रात सर्वात प्रथम स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं रेल्वे अडवून धरली. त्यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर पोलिसांनी स्वाभिमानीच्या आंदोलकांना ताब्यात घेतलं.
दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात मुंबईमध्ये काँग्रेसचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. तर राज्यातील अनेक ठिकाणीही काँग्रेस नेते आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाले. ज्येष्ठ समाजसेवक आण्णा हजारेही आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.
भाजप सरकारने लादलेल्या शेतकरीविरोधी काळ्या कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या #BharatBandh ला समर्थन देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले. pic.twitter.com/tayrZ9vk2X
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) December 8, 2020
मुंबई, नवी मुंबई, ठाणे एपीएमसी मार्केटही आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आलं आहे. अनेक रिक्षा चालक आणि मालवाहतूक संघटनाही आजच्या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. पुणे मार्केट यार्डमध्ये गाड्यांची आवक घटल्याचं पाहायला मिळालं.
दिल्लीच्या सीमेवर गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज दिल्लीत दाखल होणार सर्व रस्ते अडवून धरले. त्यामुळे आज दिल्लीची सर्व प्रवेशद्वारं बंद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. चिल्ला आणि गाझीपूर बॉर्डर शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूंनी बंद केली. तर टीकरी, झरोंदा, धनसा बॉर्डर आधीच बंद ठेवण्यात आली आहे. बदुसराय बॉर्डवरुन फक्त कार आणि दुचाकी वाहनांनाच प्रवेशाची परवानगी आहे.
Farmers’ associations demonstrate at Ghazipur-Ghaziabad (Delhi-UP) border as part of #BharatBandh call.
“If govt can make law they can repeal it as well. They must work with farmer associations and experts. We’ll leave only after we get it in writing,” says a farmer leader. pic.twitter.com/2XYp8RdgeO
— ANI (@ANI) December 8, 2020
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आज चांदणी चौक आणि सदर बाजार परिसरात पेट्रोलिंग केलं. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस खबरदारी घेताना पाहायला मिळत आहेत. दिल्लीच्या मोठ्या मार्केटची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे. दिल्लीमध्ये जागोजागी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांना नजरकैदेत ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. केजरीवाल यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर काल सिंधू बॉर्डरवर जात आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतली होती. केंद्र सरकार शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव आखत होतं. पण आम्ही त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही, असा दावा केजरीवाल यांनी दिला आहे.
भाजपा की दिल्ली पुलिस ने दिल्ली के मुख्यमंत्री श्री @ArvindKejriwal जी को ही हाउस अरेस्ट कर लिया।@AmitShah जी, क्या किसानों के पक्ष में खड़ा होना इतना बड़ा गुनाह हो गया?#BJPHouseArrestsKejriwal #आज_भारत_बंद_है pic.twitter.com/lQMEQcHqke
— AAP (@AamAadmiParty) December 8, 2020
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदमध्ये आज गुजरातच्या ग्रामीण भागात तीन राज्यमार्ग जाम करण्यात आले आहेत. या मार्गांवर आंदोलकांनी टायक जाळले. त्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळाला. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अमहदाबाद-विरमगाम महामार्ग रोखून धरला. तर काही आंदोलकांनी वडोदरामध्ये साणंदजवळ राजमार्ग रोखला. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. (Special report: response of Bharat band across india)
कोलकात्याच्या धर्मतला इथं डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धर्मतला परिसर चारही बाजूंनी बंद केला होता. मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सुजान चक्रवर्ती यांनी संपूर्ण बंगाल शेतकऱ्यांच्या समर्थनात बंद असल्याचा दावा केला.
भाजपशासित राज्य असलेल्या गोव्यात भारत बंदचा परिणाम दिसून आला नाही. गोव्यातील सर्व बाजार आणि सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरु आहे. शाळा सुरु आहेत. दरम्यान, ज्यांचा कृषी कायद्यांना विरोध आहे असे राजकीय पक्ष आणि कामगार संघटना पणजीमध्ये आजाद मैदानावर आंदोलन करत आहेत.
पंजाबमध्ये मोहाली इथं प्रदर्शन करणाऱ्या शेतकऱ्यांनी चंदीगड महामार्ग बंद केला आहे. त्याठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Punjab: Farmers protesting the farm laws in Mohali, block Chandigarh highway, on #BharatBandh pic.twitter.com/gyR8Kmoufp
— ANI (@ANI) December 8, 2020
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेशात पाहायला मिळाला नाही. मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमध्ये सकाळपासूनच सर्व व्यवहार सुरळीत सुरु आहेत. सर्व दुकानं, मार्केट, बाजार समिती, छोटे-मोठ्ये व्यवसाय सर्व काही व्यवस्थित सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम जम्मूमध्येही दिसून आला. केंद्राचे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज जम्मूतील शेतकरी रस्त्यावर उतरले. जम्मूचे शेतकरी, अनेक सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी कृषी कायद्याला विरोध दर्शवला. तर पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप पीडीपीकडून करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पीडीपीने पाठिंबा दर्शवला होता.
जयपूरच्या भाजप कार्यालयाबाहेर NSUI आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न NSUIच्या कार्यकर्त्यांकडून सुरु होता. त्यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केल्यावर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं पुढील प्रकार टळला. दुसरीकडे जयपूरच्या वापाऱ्यांनी भारत बंदला समर्थन दर्शवलं नाही. बंद करणं हा समस्येवरील उपाय नसल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलं. कोरोनामुळे व्यापारी आधीच खचला असल्यानं आता बंद नको, अशी भूमिका या व्यापाऱ्यांनी घेतली.
संबंधित बातम्या:
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं; फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
BHARAT BAND | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नजरकैदेत! दिल्लीतील आजची स्थिती काय?
Special report: response of Bharat band across india