मुंबई : ईद या सणाची प्रत्येक मुस्लीम जितक्या आतुरतेने वाट पाहत असतो, तितक्याच आतुरतेने सलमान खानचे चाहतेही या सणाच्या प्रतिक्षेत असतात. याचं कारण म्हणजे दरवर्षी ईदला सलमान खानचा सिनेमा प्रदर्शित होतो. यावर्षी सलमान खान त्याच्या चाहत्यांसाठी ‘भारत’ हा सिनेमा घेऊन आला आहे. भारतातील सलमानच्या चाहत्यांसोबतच यावेळी सौदी अरबच्या चाहत्यांनाही या सिनेमाची भेट मिळाली आहे. सौदी अरबमध्ये 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर हा सिनेमा प्रदर्शित केला जात आहे.
सौदी अरबमध्ये प्रदर्शित होणारा ‘भारत’ हा सलमान खानचा पहिला सिनेमा असणार आहे. यापूर्वी अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा सिनेमा सौदी अरबमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय सिनेमा होता. याबाबत फिल्म समीक्षक कोमल नाहटाने ट्वीट केलं.
Bharat is the first ’Salman Khan’ film to release in The Kingdom of Saudi Arabia day & date .
— Komal Nahta (@KomalNahta) June 4, 2019
सौदी अरबमध्ये बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित होणे ही खूप मोठी गोष्ट आहे. तसे पाहिले गेले तर सौदी अरबमध्ये सिनेमा प्रदर्शित होणे हीच मोठी गोष्ट आहे. कारण, सौदी अरबमध्ये 1983 पासून सिनेमांवर बॅन लावणयात आला होता. हा बॅन तब्बल 35 वर्षांपर्यंत होता. येथे पहिलं सिनेमागृह 18 एप्रिल 2018 ला रियाद येथे सुरु करण्यात आलं.
आतापर्यंत इथे लोक डीव्हीडी आणि सॅटेलाईटद्वारे सिनेमे बघायचे. मात्र, इथले नवे राजा मोहम्मद बिन सलमानच्या आधुनिकिकरणाच्या नीतीअंतर्गत सिनेमासाठी काही योजना आखण्यात आल्या. सरकारच्या योजनेनुसार, 2030 पर्यंत येथे 2000 स्क्रीन्स असलेले 300 सिनेमागृह असतील. तरीही इथली सिनेमा इंडस्ट्री जगाच्या तुलनेत खूप मागे आहे.
‘भारत’ या सिनेमात सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सलमान-कतरिनाचा सोबतचा हा सहावा सिनेमा आहे. या सिनेमात सलमान खान 17 वर्षांच्या तरुणापासून ते 60 वर्षांच्या वृद्धापर्यंतच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.
सलमान खानचा ‘भारत’ हा सिनेमा कोरियन सिनेमा ‘अॅन ऑड टू माय फादर’ चा रिमेक आहे. अतूल अग्निहोत्रीच्या रील लाईफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड आणि भूषण कुमारच्या टी-सीरीजने या सिनेमाची निर्मिती केली आहे. हा सिनेमाही सलमान खानच्या इतर सिनेमांप्रमाणे ईदला म्हणजेच 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेत्री तब्बू, अभिनेता जॅकी श्रॉफ, अभिनेत्री दिशा पटाणी, अभिनेत्री नोरा फतेही, अभिनेता सुनील ग्रोवरही दिसणार आहेत.
हा सिनेमा प्रदर्शित होताच याला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 70 देशात एकूण 5300 स्क्रिन्सवर हा सिनेमा प्रदर्शित करण्यात झाला.
VIDEO :