भिवंडी : भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा समावेश आहे. अद्याप या कुटुंबातील मुलगा आणि तीन नातू ढिगाऱ्याखाली अडकले आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे या दुर्घटनेला 24 तास उलटूनही अद्याप ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. (Bhiwandi building collapse 6 People dead in one Family)
भिवंडी इमारत दुर्घटनेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली याच कुटुंबातील चौघेजण अडकले आहेत. त्यात मुलगा आणि 3 नातवांचा समावेश आहे. तर एक मुलगा आणि सूनेचा मृतदेह रात्री बाहेर काढण्यात आला आहे. या कुटुंबाातील नातेवाईक शेख युसूफ आपल्या कुटुंबियांचे मृतदेह बाहेर काढण्याची वाटत पाहत दु:खी अवस्थेत बसून आहेत.
Death toll in the Bhiwandi building collapse incident rises to 20: Thane Municipal Corporation #Maharashtra
— ANI (@ANI) September 22, 2020
भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.
या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेला 24 तास उलटूनही अद्याप ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच इमारतीतील अजून काही व्यक्ती या ढिगाऱ्याखाली अडकल्याचं बोललं जात आहे.
या दुर्घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील. तर जखमी झालेल्या नागरिकांचा खर्च शासन उचलेल अशी घोषणा मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Bhiwandi building collapse 6 People dead in one Family)
संबंधित बातम्या :
Bhiwandi building Collapse | भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली, 10 जणांचा मृत्यू