भिवंडी : भिवंडी शहरात एक तीन मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून तातडीने बचावकार्य सुरु आहे. दरम्यान या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील, अशी घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. (Bhiwandi building collapse Update)
मिळालेल्या माहितानुसार, भिवंडी शहरातील धामणकर नाका पटेल कंपाऊंड या परिसरातील जिलानी इमारत कोसळली. पहाटे 3.40 च्या सुमारात ही दुर्घटना घडली आहे. पहाटेच्या वेळी ही सर्व दुर्घटना घडल्याने अनेक नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या इमारतीत 25 कुटुंब वास्तव्यास होते.
#UPDATE Death toll rises to 8 in Bhiwandi building collapse incident. Five more people have been rescued: Thane Municipal Corporation PRO #Maharashtra https://t.co/kGgAEs3vDP
— ANI (@ANI) September 21, 2020
या दुर्घटनेनंतर NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत. आतापर्यंत जवळपास 14-15 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर अद्याप इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 20-25 लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लवकरात लवकर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे आदेश यासमयी एनडीआरएफ तसेच टीडीआरएफ टीमला दिले तसेच ढिगाऱ्या खालून सुखरूप बाहेर काढलेल्या नागरिकांची भिवंडी येथील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय येथे भेट घेऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली. pic.twitter.com/XIyL8HYUnq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 21, 2020
या दुर्घटनेनंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये दिले जातील. तर जखमी झालेल्या नागरिकांचा खर्च शासन उचलेल असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
भिवंडी येथे दुर्घटनाग्रस्त ठिकाणी भेट दिली. NDRF ची टीम बिल्डिंग मध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थी चे प्रयत्न करत आहे pic.twitter.com/b7JpiDXX85
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 21, 2020
पटेल कंपाऊंड येथील ही इमारत सुमारे 30 वर्षे जुनी एल टाइपमधील होती. या इमारतीला महापालिकेने धोकादायक म्हणून घोषित केले होते. या इमारतीस दोन वेळा नोटीसही बजावण्यात आली होती. तरीही अनेक नागरिक या ठिकाणी राहत होते. या इमारतीचा एक भाग पूर्ण कोसळला असून दोन मजले हे जमिनीखाली गाडले गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bhiwandi building collapse Update)
संबंधित बातम्या :
महाड दुर्घटनेप्रकरणी बिल्डरसह 5 जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल