मुंबई : दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. यंदा मात्र, कोरोनाच्या सावटामुळे या आनंदावर मर्यादा आल्या आहेत. अनेक बड्या कलाकारांनी यंदा त्यांचे दिवाळी (Diwali 2020) सोहळे रद्द केले आहेत. अशातच काही बॉलिवूडकरांनी ‘ग्रीन दिवाळी’ साजरी (Green Diwali Celebration) करण्याचे आवाहन चाहत्यांना केले आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन,पर्यावरणाच्या आणि मानवाच्या आरोग्याची काळजी घेऊन दिवाळी साजरी करूया, असे त्यांनी म्हटले आहे (Bhumi Pednekar and Shivangi Joshi appeals for Green Diwali celebration).
अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) आणि शिवांगी जोशी (Shivangi Joshi) यांनी यंदा अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे. भूमी पेडणेकरने चित्रपटसृष्टीतल्या तिच्या मित्र-मैत्रिणींना आणि सहकाऱ्यांना छोटे रोपटे आणि बियाणे भेट देऊन दिवाळीला हिरव्यागार पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. भूमीने यंदा निसर्गाचे संवर्धन करण्याचा पण घेत, पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे ठरवले आहे.
‘यंदा दिवाळीच्या वेळी ‘हिरवा’ आनंद पसरवण्याच्या अगदी सोप्या विचारातून मी माझ्या कुटूंबाला, मित्रांना आणि सहकाऱ्यांना रोपे देणार आहे. मला पर्यावरणाची काळजी आहे. तसेच, दिवाळीच्या दिवसांत जवळच्या लोकांना आणि प्रियजनांना भेटवस्तू देताना मला मनापासून आनंद होतो. म्हणूनच, यावर्षी मी लोकांना भेटवस्तू देण्याची पद्धत बदलून एका नवी सुरुवात केली आहे’, असे भूमी म्हणाली (Bhumi Pednekar and Shivangi Joshi appeals for Green Diwali celebration).
My Planet, my heart ? #ClimateWarrior With our new logo out, my excitement levels are high to continue on the path of loving and nurturing our planet, alongside all you climate warriors ? pic.twitter.com/xYd80P80Gb
— bhumi pednekar (@bhumipednekar) November 10, 2020
छोट्या पडद्यावरची लाडकी ‘नायरा’ अर्थात ‘ये रिश्ता क्या केहलाता है’ फेम अभिनेत्री शिवांगी जोशीही यंदा कोव्हिडचे नियम पाळून व्हर्चुअल दिवाळी साजरी करणार आहे. देहरादून स्थित कुटुंबाची भेट न घेता ती व्हिडीओ कॉलद्वारे त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. यंदाची दिवाळी डिजिटल पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय शिवांगीने घेतला आहे.
‘लॉकडाऊनमुळे आता कुठे आपले पर्यावरण मोकळा श्वास घेत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत फटाके फोडू नये, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. मी सुद्धा यंदा घरीच मिठाई बनवणार आहे. रांगोळी काढून, दिवे लावून पूजा करणार आहे. यानंतर देहरादूनमध्ये आई-बाबा आणि इतर नातेवाईकांना फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा देणार आहे. कोरोनावर अद्याप कुठलीही लस नसल्याने, घरीच राहणे सगळ्यांच्या फायद्याचे आहे. त्यामुळे यंदा सगळे टेक्नोलॉजी वापरून दिवाळी साजरी करूया’, असे शिवांगी म्हणाली (Bhumi Pednekar and Shivangi Joshi appeals for Green Diwali celebration).
निसर्गाला आणि पर्यावरणाला कमीत कमी हानी होईल, अशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्याची पद्धत म्हणजे ‘ग्रीन दिवाळी’. आपल्याला जीवन प्रदान करणाऱ्या पृथ्वीमातेला आणि निसर्गाला जपण्यासाठी, त्यांचे संवर्धन करण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न केले गेले पाहिजेत. फटक्यांमुळे केवळ निसर्गाची हानी होत नाही तर, प्राणी, घरातील वृद्ध, आजारी लोक यांनादेखील त्रास होतो. प्रदुषणामुळे अनेकांना श्वासांचे त्रास होतात. त्यामुळे यंदा सगळ्या पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर करून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले जात आहे.
(Bhumi Pednekar and Shivangi Joshi appeals for Green Diwali celebration)