आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) नंतर आता आशियाई विकास बँकेने (ADB) देखील भारतीय वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचे कौतुक केले आहे. भारताचा विकास दर जगात सर्वात वेगवान असल्याचा दावा सर्व संस्था आणि रेटिंग एजन्सी यांनी केला आहे. केवळ चालू आर्थिक वर्षातच नाही तर पुढील आर्थिक वर्षातही भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढेल. यासोबतच ADB ने ही विकास दराचा अंदाज दिला आहे. आशियाई विकास बँकेने (ADB) चालू आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वाढीचा अंदाज 7 टक्के इतका वर्तविला आहे.
सामान्य मान्सूनच्या अंदाजापेक्षा चांगला पाऊस पाहता भारताच्या कृषी क्षेत्रात सुधारणा अपेक्षित आहे. जेव्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताचा GDP वाढीचा अंदाज 7 टक्के केला अशावेळीच ADB चा अंदाज आल्याने त्याला फार महत्व आहे. IMF ने भारताच्या वाढीचा अंदाज 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेनेही विकासदराच्या अंदाजात बदल केला होता.
आरबीआयने चालू आर्थिक वर्षाचा विकासदर 7 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ RBI आणि IMF या दोघांनीही त्यांच्या वाढीचा अंदाज 0.2 टक्क्यांनी वाढवला आहे. एशियन डेव्हलपमेंट आउटलुक (ADO) च्या जुलैच्या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्था 2024-25 (31 मार्च 2025 रोजी समाप्त) या आर्थिक वर्षात 7 टक्के दराने वाढेल. एप्रिल 2024 मध्ये ADO च्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 7.2 टक्के दराने वाढ होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 8.2 टक्के वाढ नोंदवली, जी मागील आर्थिक वर्ष 2022-23 मधील 7 टक्के होती. या अहवालात असे म्हटले आहे की, सामान्य मान्सूनच्या अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये मंद वाढ झाली. यामुळे कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा अपेक्षित आहे. जूनमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली असली तरी ही स्थिती समाधानकारक आहे. ग्रामीण भागातील विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी कृषी क्षेत्रातील सुधारणा महत्त्वाची ठरणार आहे.