Pune Rain : पुण्यात शनिवारपर्यंत अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा

| Updated on: Oct 14, 2020 | 8:25 AM

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे (Pune heavy rain).

Pune Rain : पुण्यात शनिवारपर्यंत अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा
pune rain
Follow us on

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात येत्या शनिवारपर्यंत अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे (Pune heavy rain). या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अतिवृष्टी होणाऱ्या संभाव्य भागातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला आहे (Pune heavy rain).

अतिवृष्टी झाल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागांनी याबाबत दक्षता घेऊन उपाययोजना करण्याचे आदेशही निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिले आहेत.

राज्यात 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्षानं 13 ते 17 ऑक्टोबर कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

विशेषतः किनारपट्टीलगतच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच रायगडकरांना सर्व यंत्रणांनी सावध राहण्याचा इशारा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभाग, मुंबई व मंत्रालय नियंत्रण कक्ष यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात विजेच्या कडाकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विशेषतः किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा नियंत्रण कक्षाकडून रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व यंत्रणांना सावधानतेचा व सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

विजांचा कडकडाटासह वादळी वारा वाहणार असल्याने मोकळ्या जागेत उभे राहू नये. विजेचे खांब, लोखंडी वस्तू, विद्युत वस्तूंपासून दूर राहावे. अन्नपदार्थ, बॅटरी, पुरेस औषधे, पिण्यासाठी पाणी इतर व्यवस्था करावी, अशा सूचनाही नागरिकांना देण्यात आल्या आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असं आवाहनही जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केली आहे.

हवामानातल्या बदलामुळे राज्यावर आसमानी संकट असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे याचं रुपांतर मोठ्या वादळात होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान खात्याकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. यामुळे आज तब्बल 5 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे आंध्र प्रदेश, तेलंगणासोबतच कर्नाटक, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि ओडिशामध्ये 13 ऑक्टोबरला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

Weather Alert : राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, IMD कडून अलर्ट जारी