Bigg Boss 14 | सिद्धार्थ शुक्लासह पवित्रा पुनिया, एजाज खान घराबाहेर?

| Updated on: Oct 20, 2020 | 10:49 AM

‘बिग बॉस 14’च्या घरात अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. तूफानी सिनिअर आणि काही स्पर्धक या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

Bigg Boss 14 | सिद्धार्थ शुक्लासह पवित्रा पुनिया, एजाज खान घराबाहेर?
Follow us on

मुंबई :बिग बॉस 14’च्या घरात अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. तूफानी सिनिअर आणि काही स्पर्धक या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका टास्क दरम्यान, सिद्धार्थ (Sidharth Shukla) आणि त्याच्या टीममध्ये असलेले पवित्रा पुनिया (Pavitra Puniya), एजाज खान (Eijaz Khan) हरल्याने त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. प्रेक्षकांना आता काही नवे स्पर्धक दिसणार असल्याचे कळते आहे. (Bigg Boss 14 latest update new elimination sidharth Shukla, pavitra puniya, eijaz khan out from house)

सिद्धार्थच्या टीममध्ये निक्की तंबोलीदेखील सामील होती. मात्र, निक्कीकडे घराचे विशेषाधिकार असल्याने ती घराबाहेर जाण्यापासून बचावली आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरातले हे पहिले मोठे एलिमिनेशन ठरणार आहे. पवित्रा पुनिया या पर्वाची विजेती ठरले, असा अंदाज प्रेक्षकांनी लावल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

तर, पवित्रा आणि एजाजला घराबाहेर न काढता सिक्रेट रूममध्ये ठेवले जाईल, असा अंदाज प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे. गेल्या पर्वातही रश्मी आणि देबोलिना यांना अशाच प्रकारे सिक्रेट रूममध्ये ठेवले होते. सध्या घरात तूफानी सिनिअर्सच्या टीम बनल्या आहेत. या टीमला एकत्रितपणे नवे टास्क पार पडायचे आहेत. (Bigg Boss 14 latest update new elimination sidharth Shukla, pavitra puniya, eijaz khan out from house)

रुबिना ‘बिग बॉस’ची विजेती ठरेल

‘बिग बॉस’चे ‘तूफानी सिनिअर्स’ हीना खान आणि गौहर खान रुबिनाच्या खेळणे प्रभावित झाल्या आहेत. मागील काही भागांपासून त्या दोघीही रुबिनाची बाजू घेताना दिसत आहेत. तर, हीना खानने थेट रुबिनाच (Rubina Dilaik) या पर्वाची विजेती ठरेल, असा दावा केला आहे. मात्र, सिद्धार्थ शुक्ला या निर्णयाच्या विरोधात दिसला.

निक्की तंबोलीमुळे स्पर्धक हैराण

निक्की तंबोलीमुळे घरातील इतर स्पर्धक चांगलेच हैराण झाले आहेत. निक्कीच्या शिव्या देण्याच्या सवयीपासून ते घरात काम न करण्याच्या नाटकांमुळे घरतील बाकीच्या स्पर्धकांनमध्ये वाद पाहायला मिळाले. यासगळ्यामुळे निक्कीला पुन्हा एकदा ‘फ्रेशर’ बनवण्याची संधी ‘बिग बॉस’ने (Bigg Boss) घरातल्यांना दिली होती. या टास्कनुसार घरातल्या इतर स्पर्धकांना तिचे ‘स्थायी सदस्य’पद काढून घायायचे होते. मात्र, यातही बहुमत सिद्ध न करता आल्याने निक्की विजयी ठरली. यात जान कुमार सानू, निशांत मलकानी, राहुल वैद्य, पवित्रा, एजाज यांनी निक्कीची बाजू घेतली, तर रुबिना, अभिनव, शहजाद, आणि जास्मीन भसीन हे स्पर्धक निक्कीच्या विरोधात उभे ठाकले होते.

(Bigg Boss 14 latest update new elimination sidharth Shukla, pavitra puniya, eijaz khan out from house)

संबंधित बातम्या :

 निशांत मलकानीला बिकिनी, रुबिनाला एक जोडी कपडे, ‘तूफानी सिनिअर्स’च्या त्रासाने स्पर्धक हैराण

कपडे मिळवण्यासाठी निक्की तंबोलीचा हंगामा, सिद्धार्थ शुक्लाचा मध्यस्थीचा प्रयत्न!

‘काका पळू नका, वयाच्या दृष्टीने ठीक नाही’, राहुल वैद्यचा एजाज खानला टोला!