मुंबई : ‘बिग बॉस’च्या घरात ‘कर्णधारपदा’साठीचा टास्क सर्वात महत्त्वाचा असतो. यामुळे स्पर्धकाला नॉमिनेशनमधून सुरक्षित होण्याची संधी देखील मिळते. गेल्या आठवड्यात अली गोनी ‘बिग बॉस 14’च्या घराचा कर्णधार होता. या आठवड्यात त्याच्या कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे. आता बिग बॉसने कर्णधारपदासाठी एक नवीन टास्क दिला आहे. या टास्कमध्ये रुबिना दिलैक (Rubina Dilaik) आणि राहुल वैद्य (Rahul Vaidya) यांच्या दरम्यान चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे (Bigg Boss 14 new week captaincy task between Rahul Vaidya and Rubina Dilaik).
या दरम्यान राहुल आणि रुबिनामध्ये देखील वाद पाहायला मिळाला. राहुल वैद्य अभिनव शुक्लाला टास्क दरम्यान रुबिनाचा चमचा म्हणून संबोधतो. यानंतर अभिनव आणि राहुल यांच्यात वाद सुरू झाले. यामुळे रुबिना राहुलवर भडकणार आहे.
.@rahulvaidya23 aur @RubiDilaik ke beech mein ho rahi hai takkar. Kiske paas honge ant mein zyaada hearts?#BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 @BeingSalmanKhan pic.twitter.com/OeSj95IyJ7
— COLORS (@ColorsTV) November 17, 2020
नवा कर्णधार निवडण्यासाठी बिग बॉसने दिलेल्या टास्कचे नाव होते ‘एक था राजा एक थी रानी’. या टास्कमध्ये रुबिना आणि राहुल एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणार आहेत. बाकी घरातील उर्वरित सदस्य या राजा आणि राणीचे सेवक असणार आहेत. या सेवकांना दोघांसाठी काम करावे लागणार आहे. त्याबदल्यात त्यांना पैसे मिळणार आहेत. रुबिना आणि राहुल यांच्या सेवकांना त्यांच्यासाठी दिलेल्या कागदातून बदामाचे आकार कापायचे होते. यासाठी रुबिनाला लाल तर राहुलला काळा रंग देण्यात आला होता. स्पर्धकांना हा टास्क करताना प्रतिस्पर्धी टीमला रोखायचे आहे. ज्या टीमकडे जास्त बदाम आणि पैसे जमा होणार ती टीम जिंकणार आहे (Bigg Boss 14 new week captaincy task between Rahul Vaidya and Rubina Dilaik).
Shaahi Raajya mein aamne saamne honge Black King @rahulvaidya23 aur Red Queen @RubiDilaik.#BB14 #BiggBoss2020 #BiggBoss14 @BeingSalmanKhan pic.twitter.com/IuHO3W3ogt
— COLORS (@ColorsTV) November 17, 2020
एजाज खान (Eijaz Khan) आणि कविता कौशिक (Kavita Kaushik) यांच्यातील मैत्री आता दुष्मनीत बदलली आहे. घरात कविता कौशिक आणि एजाज खान यांच्यात जोरदार वाद पाहायला मिळाला आहे. कविता आणि एजाज खान यांच्यात किचनमध्ये सुरू झालेल्या वादाला हिंसक वळण मिळाले. एजाज कविताच्या जवळ जाऊन भांडू लागताच कविताने एजाजला सरळ ढकलेले आहे. त्यानंतर एजाजने कविताला घराबाहेर काढण्याची मागणी केली होती. मात्र, एजाजची ही मागणी ‘बिग बॉस’ ने फेटाळली. कविताला केवळ समज देण्यात आली.
एक वाद शमतो तोच कविताने पुन्हा एकदा नव्या वादाची नांदी सुरू केली. स्वयंपाकघरातील काउंटर स्वच्छ नसल्यामुळे कविता कौशिकने जास्मीनला बोल लगावले. यावरून सकाळी सकाळी जास्मीन आणि कविता यांच्यात भांडण सुरू झाले. कविता जास्मीनशी भांडताना पाहून अली तिच्या समर्थनार्थ पुढे आला. पुन्हा एकदा घरात जोरदार घमासान सुरू झाले.
(Bigg Boss 14 new week captaincy task between Rahul Vaidya and Rubina Dilaik)