Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात राहुल वैद्यकडून ‘पंखुडी’ला लग्नाची मागणी!

| Updated on: Nov 12, 2020 | 11:09 AM

गुडघ्यावर बसून, हातात अंगठी घेऊन संपूर्ण जगासमोर राहुलने दिशाला लग्नाची मागणी घातली आहे.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात राहुल वैद्यकडून ‘पंखुडी’ला लग्नाची मागणी!
Follow us on

मुंबई : लोकप्रसिद्ध कार्यक्रम ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात सध्या रोज काहीतरी नवीन गॉसिप तयार होत आहेत. नुकतीच घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. या टास्क दरम्यान स्पर्धक राहुल वैद्यने (Rahul Vaidya) त्याच्या मैत्रिणीला लग्नाची मागणी घातली आहे. पांढऱ्या टी-शर्ट वर ‘Disha will you marry me?!’, असे लीपस्टिकने लिहीत, ‘बिग बॉस’च्या कॅमेरासमोर जाऊन राहुलने दिशाला (Disha Parmar) प्रपोज केला (Bigg Boss 14 Rahul Vaidya Proposed Girlfriend Disha Parmar on National Tv).

छोट्या पडद्यावरची ‘पंखुडी’ अर्थात अभिनेत्री दिशा परमारला राहुलने लग्नाची मागणी घातली आहे. हिंदी मालिका ‘प्यार का दर्द है’ यात ‘पंखुडी’ साकारत दिशा घराघरांत पोहोचली होती. अभिनेता नकुल मेहतासोबत तिची जोडी छोट्या पडद्यावर हिट ठरली होती. दिशाने राहुलसोबत एका गाण्यातदेखील काम केले होते.

राहुल-दिशाच्या नात्याच्या चर्चा

गुडघ्यावर बसून, हातात अंगठी घेऊन संपूर्ण जगासमोर राहुलने दिशाला लग्नाची मागणी घातली आहे. मात्र, दिशा-राहुलच्या नात्याची चर्चा फार आधीपासून सुरू आहे. ते दोघे गेल्या 2 वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते, असे म्हटले जात आहे. राहुल वैद्य ‘बिग बॉस’मध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्या दोघांच्या नात्याची चर्चा होती, ‘बिग बॉस 14’ सुरू झाले त्यावेळी दिशा परमारला कोरोनाची लागण झाली असल्याने, ती राहुलची भेट घेऊ शकली नव्हती (Bigg Boss 14 Rahul Vaidya Proposed Girlfriend Disha Parmar on National Tv).

दिशाला लग्नाची मागणी घालताना राहुल म्हणाला, ‘मी या मुलीला गेल्या दोन वर्षांपासून ओळखतो आहे. तिचं नाव दिशा परमार आहे. मी या आधी कधीच इतका नर्व्हस झालो नव्हतो. दिशा, माझ्यासाठी तू या जगातील सगळ्यात सुंदर मुलगी आहेस. मला माहित नाही की मी हे तुला विचारण्यासाठी इतका वेळ का घेतला? तू माझ्याशी लग्न करशील?’

दिशाची प्रतिक्रिया

अभिनेत्री दिशा परमारने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. केक कापतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. यात व्हिडीओत आजचा दिवस किती खास आहे, हे सांगताना ती दिसली. तिच्या मित्र-मैत्रिणींनी राहुलचा विषय काढताच दिशा चक्क लाजली. दिशाने राहुलच्या प्रपोजला उत्तर दिलेले नसले तरी, ती राहुल स्पर्धा जिंकावा म्हणून वोट अपील करत आहे. यावरून तिचा राहुलच्या मागणीला होकार असल्याचे चाहत्यांनी म्हटले आहे.

‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश करण्यापूर्वी राहुलला दिशासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र, त्यावेळी आम्ही केवळ मित्र आहोत, असे म्हणत त्याने या प्रश्नाला टाळले होते.

(Bigg Boss 14 Rahul Vaidya Proposed Girlfriend Disha Parmar on National Tv)