PHOTO : ‘चि. व चि.सौ.का’ फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचं लग्नानंतरचं पहिलं फोटोशूट
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. (Bigg Boss Marathi fame Sharmishtha Raut Marriage Photos)
-
-
मराठी बिग बॉस फेम अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. तेजस देसाईसोबत सप्तपदी घेत तिने नव्या आयुष्याची सुरुवात केली.
-
-
या दोघांनी लग्नानंतर पहिल्यांदाच Post Marrige Couple Shoot केलं आहे. आदित्य आर्ट ज्वेलरी यांच्यासाठी त्या दोघांनी हे फोटो शूट केलं आहे.
-
-
या दोघांचा विवाह सोहळा 11 ऑक्टोबरला अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला.
-
-
शर्मिष्ठा आणि तेजस यांनी लग्नाच्या विधीदरम्यान पेशवाई लूक परिधान केला होता.
-
-
तर लग्नाच्या रिसेप्शनदरम्यान शर्मिष्ठाने भरजरी लेहंगा तर तेजसने शेरवानी परिधान केली होती.
-
-
साखरपुडा, मेहंदी, हळद यांसह अनेक सोहळ्यांचे फोटो तिने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
-
आज सगळ्यांनी भरभरून शुभाशीर्वाद दिले, खूप प्रेम दिलं, शुभेच्छा दिल्या, तुम्हा सगळ्यांच्या सदिच्छांमुळेच आम्ही आज आमच्या नव्या प्रवासाची छान सुरुवात करत आहोत, अशी पोस्ट शर्मिष्ठाने इन्स्टाग्रामवर टाकली होती.
-
-
आम्ही दोघेही तुम्हा सगळ्यांचे मनापासून ऋणी आहोत. सगळ्यांनी काळजी घ्या आणि असंच प्रेम करत राहा, असेही तिने यात म्हटलं आहे.
-
-
“आपण सगळ्यांनी मला आणि तेजसला मनापासून स्वीकारलंत याबद्दल आम्ही दोघेही कायम तुमचे ऋणी आहोत. आता तुमच्या आणि
वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आम्ही 11.10.2020 रोजी लग्नाची गाठ बांधणार आहोत,” अशी पोस्ट तिने लग्नापूर्वी इन्स्टाग्रामवर टाकली होती.
-
-
शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई या दोघांचा जून महिन्यातच साखरपुडा पार पडला होता.
-
-
तेजस देसाई हा इंजिनीअर असून एका कंपनीत रिजनल सेल्स मॅनेजर म्हणून काम करतो.
-
-
शर्मिष्ठाचे हे दुसरे लग्न असून तिचे पहिले लग्न अभिनेत्री अर्चना निपाणकर हिचा भाऊ अमेय निपाणकर याच्याशी झाले होते. मात्र काही कारणामुळे त्यांचा घटस्फोट झाला.
-
-
मन उधाण वाऱ्याचे, जुळून येती रेशमीगाठी, कुंपण, सप्तपदी, चार दिवस सासूचे, अभिलाषा, एक झुंज वादळाशी यासारख्या मालिकेत तिने काम केले आहे.
-
-
तसेच दे धक्का, फक्त लढ म्हणा, चि व चि.सौ.का, काकस्पर्श, रंगकर्मी, योद्धा यासारख्या चित्रपटातही उत्कृष्ट अभिनयाची तिने छाप सोडली आहे.