बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की

| Updated on: Nov 03, 2020 | 5:09 PM

काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांच्यासोबत परसा विधानसभा मतदारसंघात असाच एक प्रसंग घडला होता. | Nitish Kumar

बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की
Follow us on

पाटणा: बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना गेल्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांच्या सभेत लालूप्रसाद यादव यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला होता. यानंतर आता पुन्हा एकदा नितीश कुमारांना अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराला सुरुवात झाली असून त्यासाठी नितीश कुमार हरलाखी येथे आले होते. यावेळी भाषणादरम्यान त्यांच्यावर कांदे फेकून मारण्यात आले. (Onions pelted at Nitish Kumar during election rally in Madhubani’s Harlakhi)

नितीश कुमार यांचे भाषण सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी नितीश बिहारमध्ये आपल्या सरकारने किती रोजगार दिले, याविषयी बोलत होते. बिहार आणि झारखंड एकत्र असताना तेव्हाच्या सरकारने केवळ 95 हजार नोकऱ्या दिल्या. मात्र, आमच्या सरकारच्या कार्यकाळात जवळपास सहा लाख जणांना नोकऱ्या देण्यात आल्याचा दावा नितीश कुमार यांनी केला. त्यावेळी समोरील जनसमुदायातील काही लोकांनी व्यासपीठावर कांदे भिरकावले.

हा प्रकार लक्षात येताच नितीश कुमार यांच्या अंगरक्षकांनी तात्काळ त्यांच्याभोवती सुरक्षाकडे तयार केले. यानंतरही नितीश कुमार तावातावाने भाषण देत राहिले. अजून कांदे फेका, फेकत राहा, याचा काहीही परिणाम होणार नाही, असे नितीश कुमार यांनी म्हटले. या लोकांना अटक करू नका, काही दिवसांनी त्यांना आपोआप अक्कल येईल, असे नितीश कुमार यांनी पोलिसांना सांगितले.


काही दिवसांपूर्वी नितीश कुमार यांच्यासोबत परसा विधानसभा मतदारसंघात असाच एक प्रसंग घडला होता. माजी मंत्री तेज प्रताप यादव यांचे सासरे चंद्रिका राय यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. तेव्हा काही लोकांनी भरसभेत नितीश कुमार यांच्यासमोर लालूप्रसाद यादव यांचा जयजयकार सुरु केला. लालू प्रसाद यादव यांच्या जयघोषामुळे नितीशकुमार संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले.

ना काम करण्याचा अनुभव नाही ते लोक अशा प्रकारच्या घोषणा देतात. गेल्या 15 वर्षात आम्ही बिहारमधील गुन्हेगारी संपवली आणि राज्याला विकासाच्या वाटेवर घेऊन गेलो. 15 वर्षापूर्वी काय स्थिती होती आणि आता काय स्थिती आहे ते तुम्ही पाहात, असे सांगत नितीश कुमार यांनी घोषणा करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले.

संबंधित बातम्या:

बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन: तेजस्वी यादव

(Onions pelted at Nitish Kumar during election rally in Madhubani’s Harlakhi)