पाटणा : गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचे (Bihar Vidhansabha Election) तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज (शनिवार 7 नोव्हेंबर) पार पडले. तीन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी (10 नोव्हेंबर) जाहीर होईल. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे (Bihar Vidhansabha Election Exit Poll) समोर येत आहेत. निवडणुकीत NDA ला फटका बसण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे, तर यूपीए-महागठबंधन झेप घेण्याचे संकेत मिळत आहेत. Tv9 च्या महाएक्झिट पोलनुसार (TV9 Maha Exit Poll) भाजप-जदयू यांच्या ‘एनडीए’ला 110 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राजद आणि काँग्रेस यांचं महागठबंधन 115 ते 125 जागा जिंकण्याचे संकेत आहेत. (Bihar Vidhansabha Election Exit Poll Results Live Update)
यंदाची बिहार निवडणूक ही अनेक गोष्टींमुळे लक्षवेधी ठरली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशात होणारी ही पहिलीच निवडणूक होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेवेळी विशेष काळजी घेण्यात आली होती. दुसरीकडे भाजप-जदयू यांची एनडीए (BJP JDU) विरुद्ध राजद-काँग्रेस (RJD Congress) आणि डाव्या पक्षांचे महागठबंधन यांच्यातील लढतीमुळे साऱ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागले आहे.
गेल्या 15 वर्षांपासून नितीश कुमार (Nitish Kumar) हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) यांनी प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक भाजपप्रणित एनडीएच्या अपेक्षेपेक्षा चुरशीची ठरली.
विधासभेच्या एकूण 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमतासाठी 122 ही मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळणे अवघड मानले जाते. भाजप्रणित एनडीएमध्ये जनता दल युनायटेड (जदयू), मुकेश साहनी यांचा व्हीआयपी पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षांचा समावेश आहे. तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे.
लोजपचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान (Chirag Paswan) यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला कोणताही विरोध नाही. मी त्यांचा हनुमान आहे, अशी भूमिका चिराग पासवान यांनी घेतली होती. त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने केवळ संयुक्त जनता दलाविरोधात उमेदवार उभे केले आहेत. नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यातील लढाईचा फायदा महागठबंधनला मिळण्याची शक्यता आहे.
Tv9 महाएक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125
लोजप – 3 ते 5
अन्य – 10 ते 15
ABP न्यूज -सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 104 ते 128
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 108 ते 131
रिपब्लिक टीव्ही- जनकी बातचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 91 ते 117
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 136 ते 138
टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 116
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120
लोजप – 1
अन्य – 6
(Bihar Vidhansabha Election Exit Poll Results Live Update)
Tv9 महा Exit Poll | ABP News- Cvoter | आज तक - अॅक्सिस माय इंडिया | रिपब्लिक भारत-जन की बात | टाइम्स नाऊ-Cvoter | |
---|---|---|---|---|---|
भाजप + जदयू - एनडीए | 110 ते 120 | 104 ते 128 | 91 ते 117 | 116 | |
राजद + काँग्रेस - महागठबंधन | 115 ते 125 | 108 ते131 | 136 ते 138 | 120 |
|
लोजप | 3 ते 5 | 01 | |||
अन्य | 10 ते 15 | 06 |
2014 साली बिहारमध्ये कुणाला किती जागा मिळाल्या होत्या?
राजद – 80
काँग्रेस – 27
जदयू – 71
भाजप – 53
लोजप – 2
रालोसप – 2
हिंदुस्थान आवाम मोर्चा (सेक्युलर)- 1
एकूण जागा – 243
मतदानाची टक्केवारी
पहिला टप्पा – 53.54 टक्के
दुसरा टप्पा – 53 टक्के
तिसरा टप्पा – 55.22 टक्के
कोणाच्या किती रॅली?
पंतप्रधान नरेंद्र मोदी- 12
मुख्यमंत्री नितीश कुमार- 100
तेजस्वी यादव- 251
चिराग पासवान- 103
राहुल गांधी- 8
असदुद्दीन ओवैसी- 100
55.22% voter turnout recorded till 5pm in the third and last phase of Bihar assembly elections: Election Commission of India#BiharElections pic.twitter.com/8nbcZKAJ3M
— ANI (@ANI) November 7, 2020
संबंधित बातम्या :
‘ही माझी शेवटची निवडणूक!’, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून राजकीय संन्यासाची घोषणा
बिहारमध्ये बदलाचे वारे? भरसभेत मुख्यमंत्री नितीश कुमारांवर पुन्हा ओढावली नामुष्की
(Bihar Vidhansabha Election Exit Poll Results Live Update)