तुळजापुरात आध्यात्मिक आघाडीचे आंदोलन; नगरपरिषदेने रातोरात मंडपच उखाडला

| Updated on: Nov 05, 2020 | 11:45 PM

गेल्या अनेक दिवसांपासून अध्यात्मिक आघाडीकडून सातत्याने मंदिरे खुली करण्याची मागणी केली जात आहे. | bjp adhyatmik aghadi

तुळजापुरात आध्यात्मिक आघाडीचे आंदोलन; नगरपरिषदेने रातोरात मंडपच उखाडला
Follow us on

उस्मानाबाद: राज्यातील मंदिरे खुली करण्याच्या मागणीसाठी आध्यत्मिक आघाडीचे बेमुदत ठिय्या आंदोलन तुळजापूर येथे सुरु आहे. मात्र, आता आंदोलनासाठी उभारण्यात आलेला मंडपच नगरपरिषेदेने उखडून टाकल्याने वातावरण तापण्याची शक्यता आहे. (bjp adhyatmik aghadi agitation in Tuljapur)

गेल्या अनेक दिवसांपासून अध्यात्मिक आघाडीकडून सातत्याने मंदिरे खुली करण्याची मागणी केली जात आहे. मात्र, यावर राज्य सरकार निर्णय न घेतल्याने तुषार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आजपासून आध्यात्मिक आघाडीने तुळजाभवानी मंदिरासमोर आंदोलन सुरु केले होते. मात्र, आता नगरपरिषदेने आंदोलनाचा मंडप काढून टाकल्यामुळे उद्या काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात तुषार भोसले यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी खास बातचीत केली. प्रशासनाने साधू संतांना त्रास देण्यासाठी मंडप काढला तरी उद्या सकाळी रणचंडी यज्ञ व आंदोलन करणार असल्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. प्रशासन दबाव आणण्याचा प्रयत्न करताय मात्र त्याला बळी पडणार नाही ,जोपर्यंत मंदिर खुले होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार तुषार भोसले यांनी व्यक्त केला.

मंदिराचे कुलूप तोडण्याच्या इशाऱ्यानंतर ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ

राज्य सरकारने मंदिरे खुली न केल्यास मंदिरांचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करु, या भाजप्रणित अध्यात्मिक आघाडीच्या इशाऱ्यानंतर नाशिकमधील ऐतिहासिक मंदिरांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. प्रशासनाकडून याठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कपालेश्वर मंदिरासह नाशिकमधील इतर देवळांच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय : ह.भ.प. सचिन पवार

वारकरी संप्रदायाचे मुखपत्र असलेल्या ‘वारकरी दर्पण’चे संपादक ह.भ.प. सचिन पवार यांनी राज्यातील मंदिरांचे टाळो तोडण्याची भाषा करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. मंदिराचे टाळे दरोडेखोर तोडतात, वारकरी शिस्तप्रिय आहेत. आम्ही टाळ वाजवू, पण टाळे तोडणार नाही. वारकरी नसणाऱ्या माणसांनी वारकरी संप्रदायाबद्दल बोलू नये, असे त्यांनी संबंधितांना सुनावले होते. तसेच काही लोक वारकऱ्यांचा वापर करुन मंदिरांचे टाळे तोडण्याची भाषा करत असल्याचा आरोपही सचिन पवार यांनी केला होता.

संबंंधित बातम्या:

मंदिरे उघडण्याच्या मागणीवरुन भाजप अध्यात्मिक आघाडी पुन्हा आक्रमक, राज्यपालांची भेट, मंदिरांचे टाळे तोडण्याचा इशारा

दिवाळीनंतर धार्मिकस्थळं उघडणार?, राजेश टोपेंनी केलं मोठं विधान

“दार उघड उद्धवा, दार उघड!”, तुळजाभवानीच्या प्रवेशद्वारावर भाजप आध्यात्मिक आघाडीचा बेमुदत ठिय्या

(bjp adhyatmik aghadi agitation in Tuljapur)