पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज (मंगळवारी रात्री) आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीत 27 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. ज्या विधानसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे त्या ठिकाणच्या उमेदवारांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे. (Bjp Announced First Phase List 27 Cadidate Bihar Election)
पहिल्या टप्प्यातलं मतदान 28 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. भाजपने आताच नव्याने पक्षात आलेल्या दिग्विजय सिंह यांच्या कन्या शूटर श्रेयसी सिंह यांना उमेदवारी दिली आहे. तर आरा मतदारसंघातून अमरेंद्र प्रताप सिंह यांना पक्षाने रिंगणात उतरवलं आहे.
कहलगाव विधानसभा मतदारसंघातून पवन कुमार यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर बांकामधून राम नारायण मंडल, कटोरिया मतदारसंघातून निकी हेम्ब्रम, मुंगेरमधून प्रणव कुमार यादव, लखीसरायमधून विजय कुमार सिन्हा, बाढ मतदारसंघातून ज्ञानेन्द्र कुमार सिंह ज्ञानु आणि बिक्रममधून अतुल कुमार यांची उमेदवारी पक्षाने घोषित केली आहे.
Bharatiya Janata Party releases the first list of 27 candidates for #BiharElections2020 pic.twitter.com/vxmymAEd8d
— ANI (@ANI) October 6, 2020
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर
बिहार विधानसभेसाठी एकूण तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबर आणि तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोडा यांनी ही घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना मतदान करण्यासाठी एका तासाचा अधिक वेळ देण्यात आलेला आहे.
देवेंद्र फडणवीस यांची बिहार भाजपच्या प्रभारीपदी नियुक्ती
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर भाजपने नवी जबाबदारी टाकली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांची बिहारच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे. गेल्या आठवड्यात भूपेंद्र यादव यांनी फडणवीसांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.
(Bjp Announced First Phase List 27 Cadidate Bihar Election)
संबंधित बातम्या
बिहार जिंकणारच, प्रभारीपदी नियुक्ती होताच देवेंद्र फडणवीसांचा एल्गार
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस बिहार निवडणूक प्रभारी, नवी दिल्लीत भूपेंद्र यादवांची घोषणा
Bihar Assembly Elections 2020 | बिहार निवडणुकांच्या तारखा जाहीर, तीन टप्प्यांत निवडणूक