Fadnavis meet CM | ग्राऊंडवर सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांसोबत रोखठोक चर्चा

| Updated on: Jun 13, 2020 | 6:54 PM

कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. Devendra Fadnavis Meet CM Uddhav Thackeray

Fadnavis meet CM | ग्राऊंडवर सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांसोबत रोखठोक चर्चा
Follow us on

मुंबई :निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणाचे प्रचंड नुकसान झाले आहे. चक्रीवादळ गेल्यानंतर 10-11 दिवसांनी सरकारचं अस्तित्वच दिसत नाही, वादळग्रस्तांना अद्याप मदत मिळालेली नाही,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर दिली. कोकण दौऱ्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांनी कोकणासाठी विविध मागण्या केल्या. (Devendra Fadnavis Meet CM Uddhav Thackeray)

“चक्रीवादळानंतर 10-11 दिवस उलटून गेले आहेत. मात्र अद्याप सरकारचं अस्तित्व काहीच दिसत नाही. वादळग्रस्तांना मदत मिळालेली नाही. आता सरकारने तातडीची मदत देऊन कोकणाला उभं करण्यासाठी तात्काळ पावलं उचलण्याची गरज आहे,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तात्काळ रोख रक्कम मदत करा

“कोकण चक्रीवादळाच्या दौऱ्यात माझ्यासमोर जे सत्य आलं, ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं. वादळग्रस्तांना एक रुपयाचीही मदत मिळालेली नाही. सरकारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही, लोकांना शाळांमध्ये कोंबून ठेवलं आहे, विदारक चित्र उद्धवजींसमोर मांडलं. लोकांना तात्काळ रोख रक्कम मिळायला हवी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली, असे फडणवीस यांनी सांगितले.

“कोकणात पत्र्यांचा काळा बाजार सुरु आहे. बोटींचं मोठं नुकसान झालं आहे, लॉकडाऊन आणि वादळांमुळे मच्छिमारांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कर्ज माफ करावं. छोट्या दुकानदारांना मदत होणे आवश्यक आहे. पर्यटन उद्योगाला उभं करायला हवं, त्यांच्या कर्जावरील व्याज माफ द्यावं,” अशीही मागणी फडणवीसांनी केली.

“झाडं उन्मळून पडली आहेत, हेक्टरी 50 हजारांची मदत तोकडी आहे. झाडं पुढची १० वर्षे उत्पादन देऊ शकणार नाहीत. त्यामुळे फळ पिकांची योजना लागू करुन त्यांना मदत करणे आवश्यक आहे,” असा सल्लाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना दिला.

नागरिक घराबाहेर राहतील, तोपर्यंत घरभाडे द्यावे

“झाडं पडली आहेत, ती साफ करणे आवश्यक आहे. पावसामुळे रोगराई पसरु शकते. त्यासाठी रोजगार हमीची कामं हाती घ्यावी, त्यासाठी वनविभागाची मदत घ्यावी,” असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

“पत्र्याच्या काळाबाजार सुरु आहे. त्यामुळे तात्काळ 3-4 कंपन्यांशी करार करुन पत्र्यांची किंमत घोषित करावी. त्यामुळे काळाबाजार थांबेल,” असे फडणवीसांनी सांगितले.

“घरं पडली आहेत. जोपर्यंत हे नागरिक घराबाहेर राहतील. तोपर्यंत घरभाडे द्यावे. आत्मनिर्भर पॅकेजद्वारे ज्या योजना आहेत. त्या कोकणात लागू कराव्या. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक विचार करु,” असं म्हटलं आहे.  (Devendra Fadnavis Meet CM Uddhav Thackeray)

संबंधित बातम्या : 

पेट्रोल-डिझेलवर वाढीव कर नको, सिगरेट-तंबाखूवर ‘कोरोना सेस’ आकारा : बाळा नांदगावकर

बाळासाहेब थोरात रायगड दौर्‍यावर, नागावमध्ये वादळग्रस्तांना दहा हजाराचा चेक