जळगावातील जामनेर येथील भाजपाचे नेते दिलीप खोडपे यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रवादीची तुतारी वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. खोडपे यांनी जामनेरमधून गिरीश महाजन यांच्या विरोधात उभे करण्याचा शरद पवार यांची योजना असल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात नांदेड येथे आलेल्या भाजपाचे मंत्री गिरीश महाजन आणि अशोक चव्हाण यांच्या हस्ते माजी खासदार चिखलीकर यांच्या घरातील गणरायाची आरती करण्यात आली. त्यावेळी गिरीश महाजन यांनी पक्ष हा पक्ष असतो. लोक येत जात असतात. घोडा मैदानजवळ आहे अशा शब्दात गिरीश महाजन यांनी टोला लगावला आहे.
गिरीश महाजन पुढे म्हणाले की खडसेंचा ही खूप मोठा प्रवास होता.ते गेले काय राहीलं त्यांचं,काहीच राहिलं नाही. जे पक्ष सोडून गेले नाहीत. त्यांच्या पत्नीसुद्धा निवडून आल्या नाहीत दूध डेअरीमध्ये,आमचे चाळीसगावचे आमदार मंगेश दादा चव्हाण ते त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले. 150 किलोमीटर लांब जाऊन त्यांच्या मतदारसंघात. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी खडसे वहिनींचा पराभव केला. त्या दूध डेअरीच्या चेअरमन होत्या.जिल्हा बँकेवर त्यांचं काही राहिलं नाही.विधानसभेला त्यांच्या कन्या देखील पडल्या आहेत. पक्ष हा पक्ष असतो, कोण येतं, जातं हे चालू राहणार आहे, ज्यांना आजमवायचयं त्यांनी आजमावावे असाही टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
महामंडळ वाटपात शिंदे यांच्या गटाला प्राधान्य दिले गेले आहे. याबद्दल ते म्हणाले की हा विषय पक्षश्रेष्ठी बघतात मला वाटतं देवेंद्रजींना हा विषय माहीत असेल. भरत गोगावले यांना संधी मिळालेली नाही. याबाबत ते म्हणाले की बरोबर आहे, येत्या पंधरा – वीस दिवसात आचारसंहिता लागणार आहे मंत्रीपद मिळून करणार काय, पुढच्या मंत्रिमंडळात ते पहिल्यांदा शपथविधी घेतील असेही गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. मनसे नेते अमित ठाकरे विधानसभेत निवडणूक लढविणार आहेत. याबदद्ल विचारले असता गिरीश महाजन म्हणाले की चांगलं आहे, त्यांचा पक्ष वेगळा आहे. मला वाटतं ते निवडणूक लढवतात त्यात वावगं काय आहे. येत्या विधानसभेत मला वाटतं मैत्रीपूर्ण लढत कुठे होणार नाहीत. माझ्या माहितीप्रमाणे, आम्ही एकत्रपणे लढू असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.
आम्ही महायुतीकडून निवडणूक लढवत आहोत. सगळे आमदार निवडून आल्यानंतर मुख्यमंत्री कोणाला करायचं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील.आमचा मुख्यमंत्री होईल असं कोणी बोलू नये तो निर्णय महायुतीचा असेल. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु झाले आहे याबाबत विचारले असता ते म्हणाले की मला वाटतं जे नियमात आहे तेच सरकार करू शकतं. नियम बाह्य काही करू शकत नाही आणि कोर्ट ही त्याला मान्यता देणार नाही.आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि प्रामाणिक भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.