महेश सावंत, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, सिंधुदुर्ग | 13 फेब्रुवारी 2024 : संजय राऊत जिकडे पाय ठेवतात तो पक्ष संपलेला असतो. आता वंचित आघाडीकडे संजय राऊतांनी आपलं लक्ष वळवलं आहे. जे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला समजलं नाही ते प्रकाश आंबेडकर यांनी ओळखावं आणि आपला पक्ष वाचवावा, असा सला भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी दिली. माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांवर कडाडून टीका केली.
काय म्हणाले नितेश राणे ?
आज सकाळी छत्रपती संभाजी नगर वरून पाद्र्या पावट्या टरटर करत होता. आणि मी म्हटल्याप्रमाणे चपट्या पायाचा संजय राऊत जिकडे पाय ठेवतो तिथे ते घर तुटतं किंवा तो पक्षच फुटतो, त्याचं नामोनिशाण शिल्लक रहात नाही. राऊत यांनी स्वत:च्या मालकाची अवस्था आज घर का ना घाटका अशी करून टाकली आहे. मी वपार साहेबांचा चेला आहे, असे राऊत म्हणायचे. आज त्याच पवार साहेबांची स्थिती काय झाली आहे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे. आणि मी काही दिवसांपूर्वी ट्विटमध्ये हेच सांगितलं होतं की, उद्धव ठाकरेंना संपवलं, पवार साहेबांना संपवलं, आता उरली काँग्रेस.. आता काँग्रेसची काय स्थिती झाली आहे हे तुम्ही सर्वच पहात आहात. संजय राऊत यांना कोणीही घरात पक्षात घेऊ नये, असा टोला राणे यांनी हाणला.
महाविकास आघाडीचा पोपट अधिकृपणे मेलेला आहे.
2019 पासून लोकमतच्या विरोधात जाऊन राजकारण कोणी नासवल हे राऊतांनी आरशात पाहिलं असत तर त्यांना समजलं असतं, असं राणे म्हणाले. आता तुम्ही किती वल्गना केल्यात तरी महाविकास आघाडीच्या फलकाला जाऊन हार घाला. कारण महाविकास आघाडीचा फलक अधिकृतपणे मेलेला आहे, असेही त्यांनी नमूद केलं.
प्रकाश आंबेडकरांनी पक्ष वाचवावा
आमची गाडी सुसाट निघाली आहे. आमच्या रस्त्यात जे जे येतील ते नेस्तनाबुत होतील. आता उद्धव ठाकरे संपले, पवार साहेब संपले, काँग्रेस संपली. आता संजय राऊत यांनी वंचित आघाडीकडे आपलं लक्ष वळवलं आहे. जे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसला समजलं नाही ते प्रकाश आंबेडकर यांनी ओळखावं आणि आपला पक्ष वाचवावा, नाहीतर तुमचीही स्थिती इतरांसारखी होईल असा सल्ला नितेश राणे यांनी दिला. उद्धव ठाकरे संवल्यानंतर आता संजय राऊत यांचं लक्ष जो बायडन आहे असं वाटत, असा टोलाही त्यांनी लगावला.