पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, ‘आयसोलेट’ झाल्याची ट्विटरवरुन दिली होती माहिती

| Updated on: Dec 02, 2020 | 2:43 PM

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी तशी माहिती दिली आहे. ताप आणि सर्दीचा त्रास जाणवू लागल्याने पंकजा मुंडे यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं होतं.

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह, आयसोलेट झाल्याची ट्विटरवरुन दिली होती माहिती
Follow us on

बीड: भाजपच्या राज्यातील बड्या नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. तशी माहिती पंकजा मुंडे यांच्या निकटवर्तींयांकडून देण्यात आली आहे. राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. या मतदानापासून पंकजा मुंडे लांब राहिल्या. त्यावेळी अनेक उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यावर पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री उशिरा ट्वीट करुन आपण आयसोलेट असल्याची माहिती दिली होती.(Pankaja Munde’s corona test is negative)

“पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरीषजी बोराळकर यांना पहिल्या पसंदीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे. त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे..अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी,” असे ट्वीट पंकजा मुंडे यांनी सोमवारी रात्री 11.31 च्या सुमारास केलं होतं.

सर्दी, खोकला, ताप ही सर्व कोरोनाची लक्षण आहेत. पंकजा मुंडेंना ही सर्व लक्षण जाणवू लागल्यानं त्यांनी स्वत:ला isolate केलं होतं.

धनंजय मुंडे यांच्याकडून तब्येतीची विचारपूस

सामाजिक न्यायमंत्री आणि पंकजा मुंडे यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी मंगळवारी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा यांना प्रकृतीला काळजी घेण्याचा सल्ला दिला. कोरोना विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्याबाबतच्या सर्व चाचण्या करून घ्याव्यात, स्वतःची व कुटुंबीयांची काळजी घ्या व लवकर बऱ्या व्हा असा सल्ला धनंजय मुंडे यांनी फोनवरून दिला आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्या तब्येतीत लवकर सुधारणा व्हावी अशा सदिच्छाही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केल्या होत्या.

संबंधित बातम्या:

मला जो त्रास झाला तो तुझ्या वाट्याला येऊ नये; धनंजय मुंडेंकडून फोनवरुन पंकजांच्या तब्येतीची विचारपूस

पंकजा मुंडे मतदानाला गैरहजर, कोणीही वेगळा अर्थ काढू नये; प्रीतम मुंडेंचं आवाहन

Pankaja Munde’s corona test is negative