अहमदनगर : मनसे पाठोपाठ आता भाजप नेत्यांनी देखील निवृत्ती महाराज देशमुख-इंदोरीकर यांची भेट घेतली आहे (BJP leader meet Indorikar maharaj). भाजपच्या अध्यात्मिक सेलचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांनी इंदोरीकर महाराजांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. आचार्य तुषार भोसले यांनी इंदोरीकरांच्या संगमनेरमधील ओझर गावी जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेवर सडकून टीका केली. आता शिवसेनेचं हिदुत्व कुठं दिसतंय? असा थेट सवाल भोसले यांनी विचारला.
तुषार भोसले म्हणाले, “इंदोरीकर महाराजांनी वारकरी संप्रदायाची पताका खेड्यापाड्यात पोहचवली. त्यांनी आपल्या कीर्तनात ग्रंथाच्या आधारे वक्तव्य केलं. या प्रकरणी इंदोरीकर महाराजांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपायला हवा होता. काही मुठभर लोकांनी कायद्याची पळवाट शोधत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय. महाराष्ट्रातील अध्यात्मातील सर्व मंडळी महाराजांच्या पाठीशी आहे.” शिवसेना हिंदूत्ववादी होती. या चार-सहा महिन्यात शिवसेनेचा हिंदूत्वाद कुठे दिसतो? असाही सवाल भोसले यांनी विचारला.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडून इतर कुणाला भेटायलाही तयार होत नाहीत. त्यामुळे आमच्या अडचणी राज्यपालांकडे मांडल्या आहेत. पुनश्च: हरिओमच्या नावाखाली दारुंच्या दुकानांसह सगळेच उद्योग सुरु केले. हरीला मात्र लॉक करुन ठेवलं आहे,” अशी टीका तुषार आचार्य यांनी सरकारवर केली.
दरम्यान, मनसे नेते अभिजीत पानसे यांनी देखील इंदोरीकर महाराजांची भेट घेतली होती. समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी असं वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज (Indurikar Maharaj controversy) अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला सुरु असताना, आज मनसे नेत्याने भेट घेऊन, इंदोरीकर महाराजांशी चर्चा केली. (MNS Abhijit Panse meet Indorikar Maharaj)
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी अभिजीत पानसे आणि इंदोरीकर महाराज यांची भेट झाली. इंदोरीकर महाराजांच्या निवास्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांनी बंद दाराआड अर्धातास चर्चा केली. इंदोरीकर गुन्हा दाखल झाल्यावर ही भेट झाली. यावरुन मनसे इंदोरीकरांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट झालं. आता भाजपही इंदोरीकरांच्या पाठिशी असल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचा :
इंदोरीकरांचं काम विसरुन चालेल का? मनसे नेता थेट इंदोरीकरांच्या घरी, अर्धा तास चर्चा
‘मी असं बोललोच नाही’, तृप्ती देसाईंच्या कायदेशीर नोटीसला इंदोरीकर महाराजांचं उत्तर
Indorikar Maharaj | इंदोरीकर महाराजांना कोर्टात हजर राहावंच लागणार!
BJP leader meet Indorikar maharaj