भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2019) भाजपने पहिली आणि दुसरी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काल रात्री उशिरा (23 मार्च) तिसरी यादीही जाहीर केली. पहिल्या यादीत भाजपने 182 उमेदवारांची घोषणा केली, तर दुसऱ्या यादीत फक्त एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती. तिसऱ्या यादीत भाजपने 36 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे […]

भाजपची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील सहा उमेदवारांची नावं घोषित
Follow us on

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2019) भाजपने पहिली आणि दुसरी उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतर काल रात्री उशिरा (23 मार्च) तिसरी यादीही जाहीर केली. पहिल्या यादीत भाजपने 182 उमेदवारांची घोषणा केली, तर दुसऱ्या यादीत फक्त एकाच उमेदवाराची घोषणा करण्यात आली होती. तिसऱ्या यादीत भाजपने 36 उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील सहा मतदारसंघाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत भाजपने बारामतीमधून राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंविरोधात कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपच्या तिसऱ्या यादीत जळगाव, नांदेड, दिंडोरी, पुणे, बारामती, सोलापूर येथील उमेदवारांची घोषणा भाजपने केली आहे. जळगावमधून स्मिता वाघ, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरीतून भारती पवार, पुण्यातून भाजपचे वरीष्ठ नेते गिरीष बापट, बारामतीतून कांचन कुल आणि सोलापूरमधून जयसिद्धेश्वर स्वामी हे उमेदवार भाजपकडून लढणार आहेत.

भाजपच्या तिसऱ्या यादीतील महाराष्ट्रातील उमेदवारांची नावं

  • गिरीष बापट, पुणे
  • कांचन कुल, बारामती
  • जयसिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
  • स्मिता वाघ, जळगाव
  • प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड
  • भारती पवार, दिंडोरी

भाजपने लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात एकूण 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मत्री नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज भाजप नेत्यांची नावं पहिल्या यादीत आहेत. पहिल्या यादीत भाजपने दोन विद्यमान खासदारांना डच्चू दिला आहे, तर तिसऱ्या यादीतही भाजपे पुण्याचे विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांना डच्चू दिला आहे.

भाजपचे आतापर्यंत जाहीर झालेले उमेदवार

महाराष्ट्र

  1. नागपूर – नितीन गडकरी
  2. नंदुरबार – हिना गावित
  3. धुळे – सुभाष भामरे
  4. रावेर – रक्षा खडसे
  5. अकोला – संजय धोत्रे
  6. वर्धा – रामदास तडस
  7. चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
  8. जालना – रावसाहेब दानवे
  9. भिवंडी – कपिल पाटील
  10. उत्तर मुंबई  – गोपाळ शेट्टी
  11. उत्तर मध्य मुंबई – पूनम महाजन
  12. नगर – सुजय विखे
  13. बीड – डॉ. प्रीतम मुंडे
  14. लातूर – सुधाकरराव श्रंगारे
  15. सांगली – संजयकाका पाटील
  16. चंद्रपूर – हंसराज अहीर
  17. गिरीष बापट, पुणे
  18. कांचन कुल, बारामती
  19. जयसिद्धेश्वर स्वामी, सोलापूर
  20. स्मिता वाघ, जळगाव
  21. प्रताप पाटील चिखलीकर, नांदेड
  22. भारती पवार, दिंडोरी
मतदारसंघभाजप/शिवसेनाकाँग्रेस/ राष्ट्रवादीवंचित बहुजन आघाडीविजयी उमेदवार
नंदुरबारहिना गावित (भाजप) के. सी. पाडवी (काँग्रेस)दाजमल गजमल मोरे (VBA)हिना गावित (भाजप)
धुळे सुभाष भामरे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस) सुभाष भामरे
जळगावउन्मेष पाटील (भाजप)गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)अंजली रत्नाकर बाविस्कर (VBA)उन्मेष पाटील (भाजप)
रावेररक्षा खडसे (भाजप) उल्हास पाटील (काँग्रेस)नितीन कांडेलकर (VBA)रक्षा खडसे (भाजप)
बुलडाणाप्रतापराव जाधव (शिवसेना)राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)बळीराम सिरस्कार (VBA)प्रतापराव जाधव (शिवसेना) आघाडी
अकोलासंजय धोत्रे (भाजप) हिदायत पटेल (काँग्रेस)प्रकाश आंबेडकरसंजय धोत्रे (भाजप)
अमरावतीआनंदराव अडसूळ (शिवसेना)नवनीत कौर राणा गुणवंत देवपारे (VBA)नवनीत कौर राणा
वर्धा रामदास तडस (भाजप) चारुलता टोकस (काँग्रेस)धनराज वंजारी (VBA) रामदास तडस (भाजप)
रामटेककृपाल तुमाणे (शिवसेना)किशोर उत्तमराव गजभिये (काँग्रेस) किरण रोडगे-पाटनकर (VBA)कृपाल तुमाणे (शिवसेना)
नागपूरनितीन गडकरी (भाजप)नाना पटोले (काँग्रेस)नितीन गडकरी (भाजप)
भंडारा-गोंदियासुनील मेंढे (भाजप)नाना पंचबुद्धे (राष्ट्रवादी)एन. के. नान्हे (VBA)सुनील मेंढे (भाजप)
गडचिरोली-चिमूरअशोक नेते (भाजप) नामदेव उसेंडी (काँग्रेस)डॉ. रमेश गजबे (VBA)अशोक नेते (भाजप)
चंद्रपूर हंसराज अहीर (भाजप) सुरेश धानोरकर उर्फ बाळू धानोरकर (काँग्रेस)अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे (VBA)बाळू धानोरकर (काँग्रेस)
यवतमाळ - वाशिमभावना गवळी (शिवसेना)माणिकराव ठाकरे (काँग्रेस)प्रो. प्रवीण पवार (VBA)भावना गवळी (शिवसेना)
हिंगोली हेमंत पाटील (शिवसेना)सुभाष वानखेडे (काँग्रेस)मोहन राठोड (VBA) हेमंत पाटील (शिवसेना)
नांदेडप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)अशोक चव्हाण (काँग्रेस) प्रा. यशपाल भिंगे (VBA)प्रताप पाटील चिखलीकर (भाजप)
परभणीसंजय जाधव (शिवसेना)राजेश विटेकर (राष्ट्रवादी)आलमगीर खान अखिल मोहम्मद खान (VBA)संजय जाधव (शिवसेना)
जालनारावसाहेब दानवे (भाजप) विलास औताडे (काँग्रेस)डॉ. शरदचंद्र वानखेडे (VBA)रावसाहेब दानवे (भाजप)
औरंगाबादचंद्रकांत खैरे (शिवसेना)सुभाष झांबड (काँग्रेस)इम्तियाज जलील (VBA)इम्तियाज जलील (VBA)
दिंडोरीडॉ. भारती पवार (भाजप)धनराज महाले (राष्ट्रवादी)बापू केळू बर्डे (VBA)डॉ. भारती पवार (भाजप)
नाशिकहेमंत गोडसे (शिवसेना)समीर भुजबळ (राष्ट्रवादी)पवन पवार (VBA)हेमंत गोडसे (शिवसेना)
पालघरराजेंद्र गावित (शिवसेना)बळीराम जाधव - बहुजन विकास आघाडीसुरेश अर्जुन पाडवी (VBA)राजेंद्र गावित (शिवसेना)
भिवंडीकपिल पाटील (भाजप) सुरेश टावरे (काँग्रेस)डॉ. ए. डी. सावंत (VBA)कपिल पाटील (भाजप)
कल्याणश्रीकांत शिंदे (शिवसेना)बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)श्रीकांत शिंदे (शिवसेना)
ठाणेराजन विचारे (शिवसेना)आनंद परांजपे (राष्ट्रवादी)मल्लिकार्जुन पुजारी (VBA)राजन विचारे (शिवसेना)
मुंबई-उत्तर गोपाळ शेट्टी (भाजप) उर्मिला मातोंडकर (काँग्रेस)गोपाळ शेट्टी (भाजप)
मुंबई - उत्तर पश्चिमगजानन कीर्तिकर (शिवसेना)संजय निरुपम (काँग्रेस)गजानन कीर्तिकर (शिवसेना)
मुंबई ईशान्य (उत्तर पूर्व)मनोज कोटक (भाजप)संजय दीना पाटील
(राष्ट्रवादी)
संभाजी शिवाजी काशीद (VBA)मनोज कोटक (भाजप)
मुंबई उत्तर मध्य पूनम महाजन (भाजप) प्रिया दत्त (काँग्रेस) पूनम महाजन (भाजप)
मुंबई दक्षिण मध्यराहुल शेवाळे (शिवसेना)एकनाथ गायकवाड (काँग्रेस)डॉ. संजय भोसले (VBA)राहुल शेवाळे (शिवसेना)
दक्षिण मुंबईअरविंद सावंत (शिवसेना)मिलिंद देवरा (काँग्रेस)डॉ. अनिल कुमार (VBA)अरविंद सावंत (शिवसेना)
रायगडअनंत गीते (शिवसेना)सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)सुमन कोळी (VBA) सुनिल तटकरे (राष्ट्रवादी)
मावळश्रीरंग बारणे (शिवसेना)पार्थ पवार (राष्ट्रवादी)राजाराम पाटील (VBA)श्रीरंग बारणे (शिवसेना)
पुणेगिरीश बापट (भाजप)मोहन जोशी (काँग्रेस)अनिल जाधव (VBA)गिरीश बापट (भाजप)
बारामतीकांचन कुल (भाजप)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)नवनाथ पडळकर (VBA)सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
शिरुर शिवाजीराव आढळराव-पाटील (शिवसेना)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगरसुजय विखे (भाजप)संग्राम जगताप (राष्ट्रवादी)सुधाकर आव्हाड (VBA)सुजय विखे (भाजप)
शिर्डीसदाशिव लोखंडे (शिवसेना)भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)डॉ. अरुण साबळे (VBA)सदाशिव लोखंडे (शिवसेना) आघाडीवर
बीडडॉ. प्रीतम मुंडे (भाजप) बजरंग सोनवणे (राष्ट्रवादी) प्रा. विष्णू जाधव (VBA)डॉ. प्रीतम मुंडे (भाजप)
उस्मानाबादओमराजे निंबाळकर (शिवसेना)राणा जगजितसिंह पाटील (राष्ट्रवादी)अर्जुन सलगर (VBA)ओमराजे निंबाळकर (शिवसेना)
लातूरसुधाकरराव श्रंगारे (भाजप) मच्छिलिंद्र कामत (काँग्रेस)राम गारकर (VBA)सुधाकरराव श्रंगारे (भाजप)
सोलापूरजयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)सुशिलकुमार शिंदे (काँग्रेस)प्रकाश आंबेडकर (VBA)जयसिद्धेश्वर स्वामी (भाजप)
माढारणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)संजय शिंदे (राष्ट्रवादी)अ‍ॅड. विजय मोरे (VBA)रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप)
सांगलीसंजयकाका पाटील (भाजप) विशाल पाटील (स्वाभिमानी)गोपीचंद पडळकर (VBA)संजयकाका पाटील (भाजप)
सातारानरेंद्र पाटील (शिवसेना)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)सहदेव एवळे (VBA)उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
रत्नागिरी-सिंधुदुर्गविनायक राऊत (शिवसेना)नवीनचंद्र बांदिवडेकर (काँग्रेस)मारुती रामचंद्र जोशी (VBA)विनायक राऊत (शिवसेना)
कोल्हापूर संजय मंडलिक (शिवसेना)धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) डॉ. अरुणा माळी (VBA)संजय मंडलिक (शिवसेना)
हातकणंगलेधैर्यशील माने (शिवसेना)राजू शेट्टी (स्वाभिमानी)अस्लम बादशाहजी सय्यद (VBA)धैर्यशील माने (शिवसेना)

निवडणुकीच्या तारखा जाहीर :

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

संबंधित बातम्या :

मोदींसह भाजपचे ‘हे’ चार दिग्गज नेते कुठून लढणार?

भाजपच्या पहिल्या यादीत दोन विद्यमान खासदारांना डच्चू

भाजपच्या पहिल्या यादीमुळे महाराष्ट्रातील दोन रोमहर्षक लढती निश्चित

पहिल्या यादीतून अडवाणींना डच्चू, गांधीनगरमधून ‘या’ बड्या नेत्याला संधी

सांगलीतून भाजपची उमेदवारी जाहीर, संजयकाका म्हणतात…