नाव लिहिण्यावरुन वाद, भाजप खासदाराने आमदाराला बुटाने झोडपलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकारणातली धक्कादायक घटना समोर आली आहे. संतकबीरनगरमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यामध्ये भाजपचे खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं. हा वाद सुरु होताच खासदार […]

नाव लिहिण्यावरुन वाद, भाजप खासदाराने आमदाराला बुटाने झोडपलं
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशच्या राजकारणातली धक्कादायक घटना समोर आली आहे. संतकबीरनगरमध्ये बुधवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक होती. यामध्ये भाजपचे खासदार शरद त्रिपाठी आणि भाजपचेच आमदार राकेश सिंह यांच्यात तुफान मारामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. विकासकामांचं उद्घाटन करताना नावं लिहिण्यावरुन हा वाद झाला, ज्याचं रुपांतर हाणामारीत झालं.

हा वाद सुरु होताच खासदार त्रिपाठी यांना बाहेर ओढून ओढून मारलं. उपस्थित मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण खासदार महोदय प्रचंड संतापले होते. खासदारांनी या घटनेनंतर स्वतःला एका बंद खोलीत कोंडून घेतलं. तर आमदार तिथेच उभे होते. जिल्हाधिकाऱ्यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ :