मुंबई : एकीकडे सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सीबीआय तपासाला वेग आलेला असतानाच भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी गंभीर आरोप केला आहे. सुशांतवर विषप्रयोग झाल्याने त्याची ऑटोप्सी (शवविच्छेदन) जाणीवपूर्वक उशिरा केली, असा दावा स्वामींनी केला. (BJP MP Subramanian Swamy claims Sushant Singh Rajput was poisoned)
“आता मारेकऱ्यांची राक्षसी मानसिकता आणि त्यांची मजल कुठवर गेली, हे हळूहळू उघडकीस येत आहे. शवविच्छेदन हेतुपुरस्सर उशिरा केले गेले. ज्यामुळे सुशांतसिंह राजपूतच्या शरीरातील विष पोटातील पाचक द्रवपदार्थात ओळखले जाण्याच्या पलिकडे विरघळतील. जे जबाबदार आहेत त्यांना पकडण्याची वेळ आली आहे” असे ट्वीट सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे.
Now the diabolical mentality of the killers and their reach is being slowly revealed: autopsy was deliberately forcibly delayed so that the poisons in SSR’s stomach dissolves beyond recognition by the digestive fluids in the stomach . Time to nail those who are responsible
— Subramanian Swamy (@Swamy39) August 25, 2020
सुशांतसिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा स्वयंपाकी नीरज, सुशांतसिंह राजपूतचा चार्टर्ड अकाउंटंट संदीप श्रीधर यांना सांताक्रूझमधील डीआरडीओ गेस्ट हाऊसला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय टीम तिथे थांबली आहे. याआधी मुंबई पोलीसही या ठिकाणी दाखल झाले आहेत.
Mumbai: Siddharth Pithani (Sushant Singh Rajput’s friend) & Neeraj, who was working as a cook at Sushant’s residence, arrive at DRDO guest house, where CBI team investigating the actor’s death case, is staying. #Maharashtra pic.twitter.com/YSd9LzUK2R
— ANI (@ANI) August 25, 2020
संबंधित बातम्या :
रियाकडून सुशांतवर आध्यात्मिक उपचार, सीबीआय पंडित, पुजारी तांत्रिक-मांत्रिकांचीही बाजू तपासणार
दिशा सालियानच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलवरुन इंटरनेट कॉलिंग, कॉल नेमके कोणी केले? तपास नाही
(BJP MP Subramanian Swamy claims Sushant Singh Rajput was poisoned)