नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहारमधील भाजपसह एनडीएच्या विजयाच्या सभेत बोलताना हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासाच्या धोरणाचा असल्याचं म्हटलं. तसेच बिहारने तेथील गुंडाराज नाकारत विकासाच्या शासनाला स्वीकारल्याचंही म्हटलं (BJP National President JP Nadda addresses party workers at BJP headquarters in New Delhi).
जे. पी. नड्डा म्हणाले, “बिहारच्या यशासाठी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो. त्यांनी देशाला आणि समाजाला पुढे नेण्यासाठी अथक परिश्रम घेतले. देशात फक्त बिहारची निवडणूक नव्हती, तर लडाखपासून कर्नाटकपर्यंतचे पोटनिवडणुकाही होत्या. त्यातही भाजपला मोठं यश मिळालं.”
“कोरोना संकट काळानंतरची ही पहिली निवडणूक होती. कोरोना संकटात जनता निवडणुकीला कसा पाठिंबा देईल, अशी आम्हाला चिंता होती. पण देशातील सर्व जनतेने कमळच्या चिन्हाचं बटन दाबून मोदींवर विश्वास दाखवलं. बिहारच्या जनतेने गुंडाराज नाकारुन विकासराजला स्वीकारलं आहे,” असंही जे. पी. नड्डा यांनी सांगितलं.
LIVETV | नरेंद्र मोदींनी तीन लाख व्हेंटिलेटरची व्यवस्था केली, दीडशे देशांना औषधांचा पुरवठा, मोदींना फक्त भारताचीच नाही, तर जगाची काळजी : जे पी नड्डा https://t.co/atVRNYvTQS @narendramodi pic.twitter.com/Krhb9m8Ph9
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2020
‘मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाचा यशस्वी सामना केला’
जे. पी. नड्डा म्हणाले, “अनेक मोठमोठे देश कोरोनासमोर हरले, पण भारताने कोरोनाचा यशस्वी सामना केला. संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. देशात एकच कोरोना चाचणी करणारी पुण्याची प्रयोगशाळा होती, आता 1650 प्रयोगशाळा झाल्या. पीपीई किट किंवा व्हेंटिलेटर देखील भारतातच तयार होत असून जगभरात निर्यात केली जातेय.”
“कोरोना संकट काळात मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली. मोदींनी देशातील कंपन्यांना प्रेरित करुन देशात व्हेंटिलेटरचं उत्पादन तयार केलं. याचा उपयोग भारतासह इतर देशातील नागरिकांनाही झाला. कोरोना संकट काळात मोदींनी फक्त देशाची चिंता नाही केली तर संपूर्ण जगाची काळजी घेतली,” असंही ते म्हणाले.
जे. पी. नड्डा यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
संबंधित बातम्या :
LIVE | बिहारच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन, भाजप कार्यालयात जल्लोष
संबंधित व्हिडीओ :
BJP National President JP Nadda addresses party workers at BJP headquarters in New Delhi