जे. पी. नड्डांचे काँग्रेसला 10 प्रश्न, राजीव गांधी फाऊंडेशनच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक

| Updated on: Jun 27, 2020 | 7:02 PM

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर अनेक आरोप केले (JP nadda question to congress) आहेत.

जे. पी. नड्डांचे काँग्रेसला 10 प्रश्न, राजीव गांधी फाऊंडेशनच्या मुद्द्यावरुन भाजप आक्रमक
Follow us on

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राजीव गांधी फाऊंडेशनच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर अनेक आरोप केले आहेत. या प्रकरणी दहा प्रश्नही जे.पी.नड्डा यांनी उपस्थित केले आहेत. “कोरोनाचे संकट आणि भारत-चीन तणावाच्या मुद्द्यांच्या आड काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी लपण्याचा प्रयत्न करु नये,” अशी टीका नड्डा यांनी यावेळी केली. “भारताचे सैनिक देशाच्या सीमारेषांचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश सुरक्षित आहे,” असेही जे.पी.नड्डा म्हणाले. (JP nadda question to congress on Rajiv Gandhi Foundation)

जे. पी. नड्डांचे काँग्रेसला 10 प्रश्न

  1. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून पैसे कसे मिळाले? 2005-2009 या काळात चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे का दिले? लक्जमबर्गने या फाऊंडेशनला 2006 ते 2009 पर्यंत पैसे दिले, असा दावा जी.पी. नड्डा यांनी केला आहे.
  2. RCEP भाग बनण्याची गरज काय होती? काँग्रेस सरकारच्या काळात चीनसोबत व्यवहार का वाढले?
  3. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पार्टी आणि चीनचा एकमेकांशी काय संबंध आहे. स्वाक्षरी केलेले तसेच स्वाक्षरी न केलेले काही MOU हा नेमका प्रकार काय?
  4. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीचा वापर लोकांच्या सेवेसाठी किंवा त्यांच्या मदतीसाठी वापरला जातो. मात्र 2005-08 या काळात ते पैसे राजीव गांधी फाऊंडेशनसाठी का दिले? देशातील जनतेला याचं उत्तर हवं आहे. देशातील जनतेने त्यांच्या मेहनतीची कमाई यात दिली आहे.
  5. यूपीए सरकारने अनेक केंद्रीय मंत्रालय, सेल, गेल, एसबीआय यासारख्या इतर संस्थांना राजीव गांधी फाऊंडेशनला पैसे देण्यास दबाव का टाकण्यात आला. खासगी संस्थांना पैसे भरण्यासाठी असा प्रकारे दबावतंत्र का करण्यात आले. यामागे नेमकं कारण काय?
  6. या फाऊंडेशनद्वारे कॉर्पोरेट संस्थाना मोठ्या प्रमाणात डोनेशनच्या स्वरुपात पैसा देण्यात आला. त्या बदल्यात त्यांनाच का कंत्राट दिले गेले?
  7. पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीचे ऑडिटर कोण होते? ठाकूर वैद्यनाथन अँड अय्यर कंपनी ऑडिटर होती. रामेश्वर ठाकूर याचे संस्थापक होते. ते राज्यसभेत खासदारही होते. तसेच 4 राज्यांचे राज्यपाल पद त्यांनी भूषवले आहे. कित्येक वर्षांपासून ते त्या कंपनीचे संस्थापक होते. अशाप्रकारच्या लोकांना कंत्राट देऊन सरकारला काय सिद्ध करायचं होतं?
  8. राजीव गांधी फाऊंडेशनला जवाहर भवनच्या नावे कोट्यावधींची जमीन नियमित भाडेत्त्वावर कशी दिली? राजीव गांधी फाऊंडेशनच्या खात्यात सीएजी ऑडिटिंगला का विरोध करत आहेत? त्याचं ऑडिट का झालेले नाही. यावर आरटीआय का लागू करण्यात आला नाही.
  9. या फाऊंडेशनने पैसे घेण्यासोबतच देण्याचेही काम केले. जे फाऊंडेशन परिवारद्वारे नियंत्रित केले जातं त्याने कशापद्धतीने पैसे दान दिले हे मला जाणून घ्यायचे आहे.
  10. मेहुल चोकसीने राजीव गांधी फाऊंडेशनद्वारे पैसे का घेतले? मेहुल चोकसीला कर्ज का दिले? राजीव गांधी फाऊंडेशनचा मेहुल चोकसीशी काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं देशाला हवी आहेत.

(JP nadda question to congress on Rajiv Gandhi Foundation)

संबंधित बातम्या : 

काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या घरी ED चा छापा, 5 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणी चौकशी सुरु

स्पेशल रिपोर्ट: डोकलामचा मुद्दा 73 दिवस ताणणारं चीनी सैन्य लडाखमध्ये फक्त 7 दिवसातच का नरमलं?