पाटणा : महाराष्ट्राच्या धरतीवर बिहारमध्ये देखील मुख्यमंत्री कुणाचा होणार यावरुन वेगवेगळी मतं व्यक्त व्हायला सुरुवात झाली आहे. एनडीएकडून निवडणुकीआधी नितीश कुमार यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. मात्र, आता जेडीयूच्या तुलनेत भाजपचे जास्त उमेदवार आघाडीवर असल्याचं दिसताच भाजपच्या काही नेत्यांनी आपला मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे बिहार एससी मोर्चाचे अध्यक्ष अजित चौधरी यांनी भाजपच्या जास्त जागा असल्याने भाजपचाच मुख्यमंत्री व्हावं, असं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी ही कार्यकर्त्यांची भावना असल्याचं म्हटलं (BJP SC Front President Ajit Chaudhari demand BJP CM amid Bihar Election Result ).
अजित चौधरी म्हणाले, “भाजपच्या जास्त जागा असल्याने भाजपचा मुख्यमंत्री व्हायला हवा. ही माझी आणि कार्यकर्त्यांची भावना आहे. बिहारच्या भविष्यासाठी भाजपचा एक चेहरा अधिक मजबूत करायला हवा. असं असलं तरी बिहारचा प्रत्येक कार्यकर्ता भाजपच्या नेत्यांच्या निर्णयाचं पालन करतात. मी देखील त्या निर्णयापासून वेगळा नाही. मी केवळ माझी आणि कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केली आहे.”
चौधरी यांच्या या विधानानंतर बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार की जेडीयूचे नितीश कुमार मुख्यमंत्री होणार याची चर्चा सुरु झाली आहे. विरोधकांनी भाजपवर धोका देणारा आणि मित्रपत्रांना संपवणारा पक्ष अशी घणाघाती टीकाही केली आहे. यानंतर भाजपने बिहारमध्ये नितीश कुमारच मुख्यमंत्री असतील असं सांगितलंय. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, “अजित चौधरी यांनी व्यक्त केलेलं मत त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा आणि गृहमंत्री अमित शहांनी याअगोदरच स्पष्ट केलंय की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारच असतील.”
संबंधित बातम्या :
संबंधित व्हिडीओ :
BJP SC Front President Ajit Chaudhari demand BJP CM amid Bihar Election Result