पुणे : लॉकडाऊनच्या कालावधीत जेवणाचा प्रश्न उद्भवलेल्या गरजवंतांसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील धावून आले आहेत. पुण्यातील कोथरुडचे आमदार असलेल्या चंद्रकांत पाटलांनी आपल्या मतदारसंघात पाच रुपयात घरपोच पोळी भाजी देण्याची घोषणा केली आहे. (Chandrakant Patil helps Kothrud Citizens During Corona)
काय करावे लागेल?
1. गरजू नागरिकांना 5 रुपयात घरपोच पोळी भाजीसाठी व्हाट्सअप नंबर “आ चंद्रकांतदादा मदत गट 1″ :- 8262879683
पोळीभाजीसाठी सकाळी 10 वाजेपर्यंत मागणी करायची आहे. नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप मेसेज करुन मागणी नोंदवावी लागणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच केली जाईल. तसेच संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मागणी केल्यावर रात्री 9 वाजेपर्यंत पोळीभाजी घरपोच मिळणार आहे.
2. ज्यांना औषधांची गरज आहे आणि डॉक्टरांनी नियमित घ्यायला सांगितली आहेत, अशा नागरिकांना 25% सवलतीच्या दरात घरपोच प्रिस्क्रिप्शननुसार औषध पोहोचवणार आहेत.
औषध सेवेसाठी व्हाट्सअप नंबर “आ चंद्रकांतदादा मदत गट 2” :- 9922037062
रोज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रिस्क्रिप्शन, नाव , पत्ता आणि मोबाईल नंबर व्हाट्सअप करावे व दुसऱ्या दिवशी औषधे घरपोच केली जातील.
फक्त गरजूंनीच लाभ घ्यावा ही विनंती, जेणे करुन जास्तीत जास्त नागरिकांना ही सेवा देता येईल. जी माणसे धोका पत्करुन हे सर्व पोहोचवणार आहेत, त्यांना विनासायास ये-जा करता यावी, यासाठी आपण प्रशासनाला विनंती केली आहे. आपल्या सगळ्यांचे सहकार्य हवं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजप कार्यकर्त्यांना आवाहन#21daylockdown #IndiaFightsCorona pic.twitter.com/ReJ1x0kiIw
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) March 25, 2020
‘कोरोना’शी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या काळात केवळ जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांना घराबाहेर पडण्यास मुभा आहे. 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनचा कालावधी असेल.
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यास जायला पोलिसांची कोणतीही आडकाठी नाही. परंतु किमान तीन फुटांचे अंतर आणि तोंडाला मास्क लावण्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असं वारंवार बजावून सांगितलं जात आहे. (Chandrakant Patil helps Kothrud Citizens During Corona)