पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात रक्ताचा साठा कमी झाला आहे (Blood Shortage in Pune amid Corona). त्यामुळे आपतकालीन स्थितीत रुग्णांच्या उपचारावर मर्यादा येत आहेत. त्यामुळेच पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नागरिकांना रक्तदानाचं आवाहन केलं आहे.
दीपक म्हैसेकर म्हणाले, “आम्ही रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा थोडा कमी झाला आहे. मी सर्व जनतेला रक्तदानाचं आवाहन करतो. आम्ही रक्तपेढ्यांनी नियोजनबद्धपणे एका ठिकाणी 15 हून अधिक लोक जमा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांकडे अनेक रक्तदात्यांचे संपर्क क्रमांक आहेत. त्यांना रक्तपेढ्यांनी प्रमाणपत्रंही दिली आहेत. ही प्रमाणपत्र किंवा त्यांचं कुठलंही ओळखपत्र तपासून रक्तदात्यांची ओळख निश्चित केली जाईल. याचा उपयोग करुन हे रक्तदान घेता येईल.”
शहरातील नागरिकांनी आपलं ओळखपत्र घेऊन दवाखान्यात किंवा रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावं, असं आवाहन म्हैसेकर यांनी केलं.
“आरोग्य, बँकिंग, विमा कंपन्यांचं काम पूर्ण बंद करता येणार नाही”
दीपक म्हैसेकर म्हणाले, “आयटी कंपन्यांनी आवश्यक सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी किमान लोकांना कामावर ठेवावं. अधिकाधिक लोकांना वर्क फ्रॉम होम द्यावं. आरोग्य, बँकिंग, विमा यांच्याशी संबंधित आय टी कंपन्यांचे अत्यावश्यक कर्मचारी कामावर येतील. या कंपनी पूर्ण बंद करता येणार नाही. या कंपन्यांनी समन्वय साधून अधिकाधिक कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम द्यावं.”
उद्योगांमध्ये शासनाच्या आदेशासंदर्भात गोंधळ होता. मात्र, त्यांच्याशी चर्चा करुन हा गोंधळ दूर करण्यात आला आहे.
संबंधित बातम्या:
टाळ्या वाजवून काही होणार नाही, आर्थिक मदत, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला स्थगिती द्या : राहुल गांधी
नवी मुंबईत आयुक्तांची अचानक भेट, ‘होम क्वारन्टाईन’ सदस्य घरी नसल्याने खळबळ
टाळ्या वाजवून काही होणार नाही, आर्थिक मदत, टॅक्स ब्रेक आणि कर्जफेडीला स्थगिती द्या : राहुल गांधी
Janta Curfew | मोनो, मेट्रो बंद, अनेक लोकल-एक्सप्रेस गाड्याही रद्द, घराबाहेर पडू नका!
संबंधित व्हिडीओ: