त्रिपोली : युरोपला जाणारी एक होडी लिबियातील किनाऱ्याजवळ बुडाली. या होडीत जवळपास 120 प्रवशाी होते. त्यापैकी 74 जण बुडाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र प्रवासी संस्थेने दिली आहे. 1 ऑक्टोबरपासून आतापर्यंत या भागात होडी तुटून बुडण्याची ही 8 वी घटना आहे (Boats sunk near coast in Libya 74 migrants submerged un).
मिळालेल्या माहितीनुसार, होडी बुडाली तेव्हा होडीवर महिला आणि लहान मुलांसह एकूण 120 प्रवाशी होते. ही घटना लिबियाच्या अल-खुम्स या बंदराच्या जवळ घडली. आंतरराष्ट्रीय प्रवासी संघटनेनुसार बुडालेल्या प्रवाशांपैकी केवळ 47 जणांनाच सुरक्षित वाचवता आलं आहे. लिबियाला 2011 मध्ये नाटोच्या समर्थनार्थ झालेल्या विद्रोहानंतर एकही स्थिर केंद्र सरकार नाही. मुख्य म्हणजे हा भाग आफ्रिकी प्रवाशांसाठी एक प्रमुख ठिकाण आहे. हे ठिकाण भूमध्य सागर ओलांडून जाण्यासाठी आणि युरोपात जाण्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं.
यावर्षी जवळपास 900 प्रवाशांनी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला
इंटरनॅशनल ऑर्गनाइझेशन फॉर मायग्रेशनच्या (IOM) आकडेवारीनुसार, यावर्षी जवळपास 900 लोकांनी क्रॉसिंगचा प्रयत्न केला. याशिवाय 11,000 प्रवाशांना समुद्रातच रोखण्यात आलं. तसेच या नागरिकांना पुन्हा लिबियात पाठवण्यात आलं. तेथे या प्रवाशांना अटक करुन त्यांचा छळ केला जातो. त्यांच्याशी गैरवर्तन होतं.
आयओएम आणि संयुक्त राष्ट्राच्या प्रवासी एजन्सी यूएनएचसीआर दोघांनी म्हटलं आहे, “लिबियाला प्रवाशांना पुन्हा सोडण्यासाठी सुरक्षित बंदर मानायला नको. तसेच समुद्रात पकडलेल्या प्रवाशांना पुन्हा तेथे पाठवू नये.
Boats sunk near coast in Libya 74 migrants submerged un