मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानी बाबा झाला. आफताब आणि त्याची पत्नी निन दुसांज यांना मुलगी झाली. इंस्टाग्रामवर चिमुकलीचा फोटोही पोस्ट करत आफताबने आनंद व्यक्त केला आहे. (Bollywood Actor Aftab Shivdasani and Nin Dusanj welcome baby girl)
“स्वर्गाचा तुकडा पृथ्वीतलावर पाठवण्यात आला आहे… देवाच्या आशीर्वादांसह. निन दुसांज आणि मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे, की आमच्या मुलीचा जन्म झाला. आम्ही ‘प्राऊड पेरेंट्स’ आहोत आणि आमचं कुटुंब तिघांचं झालं”
आफताबने शेअर केलेल्या फोटोमध्ये बाळाचा चेहरा दिसत नाही. मात्र आफताब आणि निन यांच्या हातांनी मिळून हार्ट शेप तयार केला आहे, त्यात मध्यभागी बाळाची पावले दिसत आहेत.
42 वर्षीय आफताब शिवदासानीचे हे पहिलेच बाळ आहे. आफताब आणि निन दुसांज यांनी 2014 मध्ये लगीनगाठ बांधली होती.
हेही वाचा : हार्दिक पांड्याच्या घरी पाळणा हलला, चिमुकल्या पाहुण्याचं आगमन
आफताबने 1999 मध्ये ‘मस्त’ चित्रपटात पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली होती. मात्र त्यापूर्वी मिस्टर इंडिया, शहेनशहा, चालबाज अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये त्याने बालकलाकार म्हणूनही काम केले होते. त्याचे कसूर, आवारा पागल दिवाना, मस्ती, हंगामा आणि 1920 यासारखे चित्रपट प्रचंड गाजले आहेत.
‘मस्ती’ या सिनेमामुळे आफताबला विनोदी भूमिका मिळू लागल्या. या चित्रपटाचे दोन सिक्वेलही आले. 2016 मध्ये ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ सिनेमात त्याचे दर्शन झाले होते. त्यानंतर तो मोठ्या पडद्यावर झळकलेला नाही.