मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकी आज बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असला तरी तो ज्या गावातून आलाय तिथे फारसा बदल झालेला नाही (Nawajuddin Siddiqui on Caste). नवाजुद्दीनच्या गावात आजही जातीभेद पाळला जात असून त्यावर त्याने एका मुलाखतीत तीव्र भावनाही व्यक्त केल्या आहेत (Nawajuddin Siddiqui on Caste).
“मी बॉलिवूडचा अभिनेता असो की पैसेवाला याच्याशी गावकऱ्यांचं काहीही घेणंदेणं नसतं. ते या गोष्टींपेक्षा जातीलाच अधिक महत्त्व देतात. लग्नाच्या बाबतीत तर त्यांच्या खूपच परंपरा आणि बंधनं आहेत”, असं नवाजुद्दीननं सांगितलं.
“आमच्या समाजात जातीभेदाची मूळ खूप खोलपर्यंत आहे. माझी आजी खालच्या जातीतली होती आणि त्यामुळे गावातील काही लोकांनी आमच्या कुटुंबाला स्वीकारले नाही”, असंही नवाजुद्दीनने सांगितले.
“माझी आजी छोट्या जातीतल होती. तर आमचे कुटुंब शेख होते. त्यामुळे गावातील लोकं आमच्याकडे चांगल्या नजरेने बघत नाहीत”, असंही नवाजुद्दीन सिद्धिकीने मुलाखतीत सांगितले.
दरम्यान, नुकतेच नवाजुद्दीन सिद्धीकी दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांचा सीरिअस मॅन या चित्रपटात दिसला होता. सीरिअस मॅन चित्रपटाचा प्रमुख अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी होता. या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका साकारली होती. या सिनेमात त्याचे नाव अय्यन असून त्याने तामिळ दलित व्यक्तीची व्यक्तीरेखा साकारली आहे.
संबंधित बातम्या :
Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणाची गळा दाबून हत्या, शेखर सुमन पुन्हा संतापला!
Ranveer Shorey | भारतात गांजा कायदेशीर व्हावा, रणवीर शौरीचे वादग्रस्त वक्तव्य!