मुंबई : नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असलेला बॉलिवूडचा दंबग अभिनेता सलमान खान सध्या एका व्हिडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबत्ती व सलमान खान एकत्र ‘झुम्मे की रात’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
जयपूरमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार व्यंकटेश दग्गुबत्ती यांची मुलगी आश्रिता आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सुरेंद्र रेड्डी यांचा नातू विनायक रेड्डी विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाहसोहळ्याला सलमान खानसह, अभिनेत्री बीना काक, बाहुबली फेम राणा दग्गुबत्ती, दाक्षिणात्य सिनेकलाकार नागा चैतन्य आणि त्यांची पत्नी समांथा रुथ प्रभु यांसह अनेक सिनेकलाकारांनी हजेरी लावली.
Omg #Venky nd #SalmanKhan dance ?????#AashrithaWedding pic.twitter.com/QcQw4jjBfL
— Shirisha? (@shirishasahu) March 24, 2019
या विवाहसोहळ्यावेळी सलमान खानने स्वत:च्या किक चित्रपटातील ‘झुमे की रात’ या गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने व्यंकटेश यांनाही सोबत घेत डान्स करण्यास सांगितले. आणि व्यंकटेश यांनीही सलमानला उत्तम साथ दिली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
आश्रिता आणि विनायक यांचा साखरपुडा ६ फेब्रुवारी रोजी पार पडला होता. आश्रिता एक प्रोफेशनल बेकर आणि फूड ब्लॉगर आहे. तर विनायक हा हैद्राबाद रेस क्लबचा चेअरमन असून सुरेंद्र रेड्डी यांचा नातू आहे. येत्या २८ मार्च रोजी हैद्राबादमध्ये एका वेडींग रिसेप्शनचे आयोजन केले आहे.