VIDEO : ‘मेट गाला’मध्ये प्रियांकाचा ‘चोली के पीछे’ गाण्यावर डान्स

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

न्यूयॉर्क : बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘मेट गाला’च्या एका लुकमूळे चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या मेट गालामध्ये प्रियांका अनोख्या अंदाजात चाहत्यांसमोर आली. या लुकमध्ये प्रियांकाचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात व्हीडिओत प्रियांका अभिनेत्री माधूरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेलं ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं गुणगुणताना दिसत […]

VIDEO : मेट गालामध्ये प्रियांकाचा चोली के पीछे गाण्यावर डान्स
Follow us on

न्यूयॉर्क : बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर छाप पाडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ‘मेट गाला’च्या एका लुकमूळे चांगलीच चर्चेत आली आहे. यंदाच्या मेट गालामध्ये प्रियांका अनोख्या अंदाजात चाहत्यांसमोर आली. या लुकमध्ये प्रियांकाचा आणखी एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यात व्हीडिओत प्रियांका अभिनेत्री माधूरी दीक्षितवर चित्रीत करण्यात आलेलं ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं गुणगुणताना दिसत आहे. प्रियांका चोप्राचा हा व्हीडिओ फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी इनस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मेट गाला’ या कार्यक्रमात प्रियांका चोप्राने हटके लुक केला होता. या कार्यक्रमासाठी प्रियांकाने खास डिझाईन केलेला सॉफ्ट पेस्टल गाऊन घातला होता. या गाऊनला गुलाबी आणि पिवळ्या रंगाची फेदर्स लावले होते. या थाय हाय स्लिट गाऊनला तिने शिमरी टाईट्ससोबत पिअर केले होते. त्याशिवाय गाऊनला साजेशी हेअरस्टाईल केली होती. तसेच तिने उत्कृष्ट मेकअपही केला होता. विशेष म्हणजे यासोबतच तिने आकर्षक असा मुकूटही परिधान केला होता. प्रियांकाच्या या लुकची सध्या सर्वत्र चर्चा आहे. तिने केलेल्या या लुकनंतर प्रियांकाला नेटकऱ्यांनी ट्रोलही केलं.

पण प्रियांकाने याकडे लक्ष न देता तिने मेट गाला या कार्यक्रमात चांगलीच मजा केल्याचे दिसते आहे. प्रसिद्ध फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी प्रियांकाचा एक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हीडिओत प्रियांकासोबत प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीसोबत येत आहे. यावेळी ती 1993 च्या सुपरहिट चित्रपट खलनायकमधील चोली के पीछे क्या है हे गाणे गुणगुणताना दिसत आहे. मात्र त्यानंतर प्रबल यांनी प्रियांकाला मोठ्याने गाणे गाण्यास सांगितले. त्यावेळी प्रियांकानेही प्रबलला साथ देत चोल के पीछे क्या है या गाण्याच्या दोन ओळी म्हटल्या. विशेष म्हणजे या गाण्यावर तिने डान्सही केला. यानंतर प्रबल यांनी ईशा अंबानीला गाण्याच्या पुढील ओळी म्हणाव्यात अशी विनंती केली. मात्र ईशाने मला हे गाणं माहित नाही असे सांगितले. सध्या प्रियांका आणि ईशाच्या या धमालमस्तीचा हा व्हीडिओ तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान येत्या काही दिवसात प्रियांका द स्काय इज पिंक या बॉलिवूड चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात प्रियांकाने अभिनेता फरहान अख्तर यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली आहे.

पाहा व्ही़डिओ :