Raveena Tandon | रवीनाच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल!

| Updated on: Nov 01, 2020 | 10:51 AM

या बनावट ट्विटर हँडलवरून (Fake Account) मुंबई पोलिसांची आणि परमबीर सिंह यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट केल्या गेल्या आहेत.

Raveena Tandon | रवीनाच्या नावे बनावट ट्विटर अकाऊंट, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने (Raveena Tandon) ट्विटरवर तिचे बनावट प्रोफाईल तयार करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. या बनावट ट्विटर हँडलवरून (Fake Account) मुंबई पोलिसांची आणि परमबीर सिंह यांची बदनामी करणाऱ्या पोस्ट केल्या गेल्या आहेत. तसेच, परमबीर सिंह यांच्या छायाचित्रांची छेडछाड करून ती पोस्ट केली गेली आहेत. सदर प्रकरण रवीनाच्या लक्षात येताच तिने थेट पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली आहे.(Bollywood Actress Raveena Tandon File FIR against fake twitter account on her name)

‘रवीना टंडनच्या नावावर बनावट ट्विटर प्रोफाइल तयार करण्यात आले आहे. यातून आरोपींनी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा व्हिडिओ बनवला आहे आणि काही अपमानजनक सामग्रीही पोस्ट केली. तसेच या अज्ञात आरोपीनी मराठी भाषेचा आणि मराठी भाषिकांचा देखील अपमान केला. याप्रकरणी आयटी कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, ट्विटरने हे बनावट हँडल बंद केले आहे’, अशी माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

बॉट वापरला गेल्याची शक्यता

सायबर सेलच्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘प्राथमिक तपासणीत असे आढळले आहे की, हा बॉट मुंबई पोलिस आणि राज्य सरकारची बदनामी करण्यासाठी वापरला गेला असावा. बॉट एक सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. बॉट्स सामान्यत: विशिष्ट कार्ये स्वयंचलित करण्यासाठी वापरली जातात. म्हणजे ते मानवांच्या विशिष्ट सूचनांशिवाय वापरले जाऊ शकते. शिवाय बॉट वापरणे बेकायदेशीर नाही. मात्र, अशाप्रकारे खोटे अकाऊंट तयार करून इतरांची बदनामी करणे हा कायद्याने गुन्हा आहे’. (Bollywood Actress Raveena Tandon File FIR against fake twitter account on her name)

एफआयआर दाखल

अभिनेत्री रवीना टंडनच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी या अज्ञात व्यक्ती व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवून, एफआयआर देखील दाखल केला आहे. तसेच, ट्विटरने सदर बनावट अकाऊंट बंद केले असून, या अज्ञात आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे.

रवीनाचे बॉलिवूडमध्ये पुनरागमन

गेल्या काही वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेली बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) लवकरच बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. रवीना टंडन मोस्ट अवेटेड चित्रपट अससेल्या केजीएफ 2 (KGF 2) या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती डलहौसी येथे असून एका वेब सिरीजचं चित्रीकरण करत आहे.

‘केजीएफ 2’ मध्ये रवीना टंडन आणि अभिनेता संजय दत्त महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री रवीना टंडन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या.

(Bollywood Actress Raveena Tandon File FIR against fake twitter account on her name)