मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. आतापर्यंत गोळा केलेले पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. याप्रकरणी बॉलिवूड कलाकारांनी सत्याचा नेहमी विजय होतो, अशी भावना व्यक्त केली आहे. याप्रकरणी अभिनेता अक्षय कुमार, नाना पाटेकर, अनुपम खेर यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिल्या. (Bollywood Artist on CBI For Sushant Singh Rajput Case)
या निर्णयानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ती हिने देवाचे आभार मानले. “देवा तू आमची प्रार्थना ऐकलीस, पण ही फक्त सुरुवात आहे. सत्याच्या दिशेने पडलेले हे पहिले पाऊल आहे. सीबीआयच्या चौकशीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे.” अशी प्रतिक्रिया श्वेता सिंहने दिली.
Thank you God! You have answered our prayers!! But it is just the beginning… the first step towards the truth! Full faith on CBI!! #Victoryoffaith #GlobalPrayersForSSR #Wearefamily #CBITakesOver
— shweta singh kirti (@shwetasinghkirt) August 19, 2020
सुशांतची मैत्रीण अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सत्याचा विजय झाला, असे ट्विट केले.
Justice is the truth in action ??
Truth wins …. #1ststeptossrjustice pic.twitter.com/2CKgoWCYIL— Ankita lokhande (@anky1912) August 19, 2020
सर्वोच्च न्यायलयाने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. त्यावर सत्याचा नेहमी विजय होतो, असे ट्विट अभिनेता अक्षय कुमार याने केले आहे.
SC directs CBI to investigate Sushant Singh Rajput’s death. May the truth always prevail ?? #Prayers
— Akshay Kumar (@akshaykumar) August 19, 2020
‘जय हो…जय हो.. जय हो’ असे ट्विट अभिनेते अनुपम खेर यांनी दिली. तर मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी ‘जनतेची ताकद ही आहे,’ असे ट्विट केले आहे. तर अभिनेता नील नितीन मुकेश याने ‘न्याय मिळतो,’ अशी प्रतिक्रिया दिली. (Bollywood Artist on CBI For Sushant Singh Rajput Case)
Finally #CBIForSSR!! #CBITakesOver Yeh Hai Public Ki Power.
— Nana Patekar (@imNanaPatekar) August 19, 2020
Justice prevails ?? God is great ! #JusticeforSushantSingRajput #CBIForSSR
— Neil Nitin Mukesh (@NeilNMukesh) August 19, 2020
सत्याचा विजय व्हायलाच पाहिजे, अशी प्रतिक्रिया अभिनेते मनोज जोशी यांनी दिली, तर अभिनेत्री किर्ती सॅनान हिनेही याप्रकरणी ट्विट केले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून प्रत्येक गोष्ट ही अंधूक आहे. कोर्टाने सुशांतच्या आत्महत्येचा तपास सीबीआय करणार असल्याचा आदेश दिल्याने एक आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यामुळे आता तर्क वितर्क करणं बंद करा. सीबीआयला त्यांचे काम करु द्या, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री किर्ती सॅनानने दिली.
Last 2months have been extremely restless with everything being so blurry. Supreme Court’s order to let the CBI investigate Sushant’s case is a ray of hope that the truth will finally shine??? Lets all have faith, stop speculating & let the CBI do their work now!?? #CBIForSSR ✊?
— Kriti Sanon (@kritisanon) August 19, 2020
Supreme Court directs CBI to investigate Sushant Singh Rajput’s death. Truth must prevail. #CBITakesOver
— Manoj Joshi (@actormanojjoshi) August 19, 2020
सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?
सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची बिहार सरकारची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी कायम ठेवली. वडिलांच्या तक्रारीवरुन सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येसंदर्भात एफआयआर नोंदवण्याचा बिहार पोलिसांना हक्क असल्याचे न्यायमूर्ती हृषिकेश रॉय यांच्या एकल खंडपीठाने म्हटले. बिहार पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सांगत चौकशी सीबीआयला देण्याचे कोर्टाने मान्य केले. मुंबई पोलीस सक्षम असल्याचे सांगत महाराष्ट्र सरकारनेही हा तपास सीबीआयकडे सोपवण्यास विरोध दर्शवला होता.
सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. “सीबीआय चौकशीचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महाराष्ट्र पोलिसांनी त्याचे पालन केले पाहिजे आणि मदत केली पाहिजे” असे खंडपीठाने म्हटले. अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदवण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीची याचिका फेटाळताना कोर्टाने हा आदेश दिला. ही एफआयआर पाटण्याहून मुंबईत हस्तांतरित करुन बिहार पोलिसांकडून होणाऱ्या चौकशीला स्थगिती देण्याची मागणी रियाने केली होती. सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आपल्या मुलाला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे.
सुशांतसिंह राजपूत याचा मृतदेह 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरी सापडला होता. सुशांतच्या अनैसर्गिक मृत्यूबद्दल मुंबई पोलिस कारवाई करत असताना त्याच्या वडिलांनी 25 जुलै रोजी रिया चक्रवर्ती आणि इतर पाच जणांविरोधात पाटणा येथील राजीव नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. (Bollywood Artist on CBI For Sushant Singh Rajput Case)
संबंधित बातम्या :
मुंबई पोलिसांना सुप्रीम कोर्टाचा धक्का, सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
ठाकरे सरकारची दादागिरी संपेल, सोमय्यांचा हल्लाबोल, राणे ते शेलार, विरोधकांचा घणाघात